Gold Rate Today : सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे. देशात यावेळी सोने-चांदीच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. तुम्हीही सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल तर आजचे सोने-चांदीचे दर जाणून घ्या. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स 0.60 टक्क्यांनी घसरून आज 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 878 प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. तर चांदीच्या दरात एक टक्क्याने वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा दर 60,840 रूपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 51,140 रुपये प्रतिग्रॅम आहे. तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर :

शहर सोने (22 कॅरेट) 1 किलो चांदीचा दर 
मुंबई 46,787 60,720
पुणे 46,787 60,720
नाशिक 46,787  60,720
नागपूर 46,787 60,720
दिल्ली 47,713 60,620
कोलकाता 46,732 60,640

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ

जागतिक बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दरात तेजी दिसत आहे. सोन्याच्या किमती गेल्या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून किंचित वाढल्या आहेत. भाव वाढल्यानंतरही सोन्याचा भाव 50 हजार रुपयांच्या खाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव काय?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 87 रुपयांनी वाढून 49 हजार 960 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर,आज सकाळी सोन्याचा भाव 49 हजार 930 रुपयांनी सुरु झाला, मात्र काही काळानंतर दरात वाढ झाली.

चांदीची स्थिती कशी होती?
चांदीच्या दरांतही वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव 269 रुपयांनी वाढून 59 हजार 531 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आधीच्या सत्रात सोन्याचा भाव 59 हजार 437 रुपयांवर होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या