SBI MCLR Rate : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. स्टेट बँकेकडून तुम्ही कर्ज घेतले असल्यास अथवा तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तुमच्या कर्जाचा हप्ता (EMI) आणखी महागणार आहे. स्टेट बँकेने पुन्हा एकदा MCLR मध्ये वाढ केली आहे. नवीन दर रविवारपासून लागू करण्यात आली आहे. 


10 बेसिस पॉईंटची वाढ


बँकेने दुसऱ्यांदा MCLR मध्ये वाढ केली आहे. या वेळेस बँकेने 10 बेसिस पॉईंटची म्हणजे 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे. सर्व कालावधीसाठी घेतलेल्या कर्जांसाठी हा नवीन दर लागू होणार आहे. 


>> नवीन दर काय?


ओव्हरनाइट, एक महिना, तीन महिन्यांसाठी MCLR दर 6.75 टक्क्यांहून वाढून 6.85 टक्के झाला आहे. 


सहा महिन्यांसाठी एमसीएलआर 7.15 टक्के झाला आहे . 


त्याशिवाय एक वर्षासाठी एमसीएलआर 7.20 टक्के झाला आहे. 


दोन वर्षांसाठी एमसीएलआर 7.40 टक्के झाला आहे. 


तर, तीन वर्षांसाठी एमसीएलआर 7.50 टक्के झाला आहे. 


>> कोणत्या ग्राहकांवर परिणाम?


गृह कर्ज, वाहन कर्ज अथवा वैयक्तिक कर्ज घेतलेल्या ग्राहकांवर याचा परिणाम होणार आहे. त्याशिवाय आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांना अधिक EMI भरावा लागणार आहे. 


स्टेट बँकेने एप्रिल महिन्यातही कर्जाच्या दरात वाढ केली होती. वर्ष 2019 नंतर आतापर्यंत गृह कर्जाच्या लेंडिंग रेट्समध्ये 40 बेसिस पॉईटंची वाढ झाली आहे. 


रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर खासगी आणि सरकारी बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे. त्याच्या परिणामी आता कर्ज महागली आहेत. 


>> MCLR म्हणजे काय?


Marginal Costs of Fund-Based Lending Rate म्हणजे MCLR हा रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर लागू केला. MCLR मुळे ग्राहकांना कर्ज घेणे सोपं झालं. MCLR म्हणजे घेतलेल्या कर्जावरील किमान व्याज दर असतो. याआधी कर्जाच्या व्याजासाठी बेस रेट असायचा. मात्र, आरबीआयने 1 एप्रिल 2016 पासून MCLR लागू केला. बँक आणि ग्राहक या दोघांचाही फायदा व्हावा, बँकेच्या व्याज दर ठरवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी MCLR लागू करण्यात आला.