UPSC Interview Questions : अनेक उमेदवार वर्षानुवर्षे UPSC परीक्षेची तयारी करत असतात. UPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुणांकडून मेहनत घेतली जाते. दरवर्षी देशातील लाखो तरुण अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत यूपीएससीची परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. युपीएससी परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. यूपीएससीच्या मुलाखतीत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न, पाहुयात असेच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं...
यूपीएससीच्या (UPSC) मुलाखतींमध्ये असं अनेकदा दिसून येतं की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो. पण उत्तर देताना गोंधळल्यामुळे उमेदवार (Applicant) उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
प्रश्न : हत्ती 24 तासांमधील किती तास झोपतो?
उत्तर : हत्ती एका दिवसात जवळपास 4 ते 5 तासांसाठी झोपतो.
प्रश्न : 11 मध्ये कधी दोन जोडल्यानंतर उत्तर 1 येतं?
उत्तर : जेव्हा घड्याळात 11 वाजतात, तेव्हा 12-1 जोडल्यावर 1 वाजतो.
प्रश्न : असा कोणता सजीव आहे, ज्याचं हृदय एका कारएवढं मोठं असतं?
उत्तर : व्हेल मासा. समुद्रात राहणाऱ्या जलचरांमध्ये व्हेल हा एक मोठा मासा आहे. त्यात स्पर्म व्हेल, किलर व्हेल, पायलट व्हेल, बेलुगा व्हेल इत्यादी प्रजाती आहेत. त्यापैकी ब्लू व्हेल सर्वात मोठी प्रजाती आहे. त्याची लांबी 115 फूट आणि वजन 150 ते 170 टनांपर्यंत असतं. त्याचं हृदयही मोठं असतं.
प्रश्न : एक व्यक्ती एका अंधाऱ्या खोलीत बसली आहे, त्या खोलीट मेणबत्ती, दिवा काहीच नाहीये, पण तरिसुद्धा तो वाचन करत आहे, कसा?
उत्तर : अंधाऱ्या खोलीत बसलेली व्यक्ती दृष्टीहिन आहे. त्यामुळे ती व्यक्ती ब्रेल लिपीच्या मदतीनं वाचत आहे. कारण ब्रेल लिपी वाचण्यासाठी हाताच्या बोटांचा वापर केला जातो.
प्रश्न : शोध आणि संशोधनातील फरक काय?
उत्तर : शोध म्हणजे, तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं शोधत आहात, जी आधीपासूनच अस्तित्वात आहेत. आणि संशोधन म्हणजे, एखाद्या नव्या विषयावर सखोल माहिती घेणं आणि निष्कर्षापर्यंत पोहोचणं.
प्रश्न : असं कोणतं फुल आहे, ज्याचं वजन 10 किलो असतं?
उत्तर : रेफ्लीसिया फूल. हे फुल मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये आढळून येतं. ही एक परजीवी वनस्पती आहे, ज्याचं फूल वनस्पतिविश्वातील सर्व वनस्पतींच्या फुलांपेक्षा मोठं आहे. सुमारे 14 मीटर व्यासाचं हे फुल असतं. त्याचं वजन 10 किलोग्रॅमपर्यंत असू शकतं.
प्रश्न : असं कोणतं फळ आहे, जे पिकण्यासाठी तब्बल 2 वर्ष लागतात?
उत्तर : अननस
प्रश्न : Calculator ला मराठीमध्ये काय बोलतात?
उत्तर : गणनयंत्र, असं संबोधलं जातं. 17 व्या शतकापासून कॅल्क्युलेटर या शब्दासह Calculator चा वापर सुरू झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- UPSC Interview Questions : अशी कोणती गोष्ट आहे जी खाण्यासाठी विकत घेतली जाते पण खाल्ली जात नाही? जाणून घ्या UPSC मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे
- Tricky Questions : वकील नेहमी काळा कोट का घालतात? कोणत्या ग्रहावर सर्वाधिक चंद्र आहेत?; तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं माहितीयेत?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI