Kashi Vishwanath : काशीचे (kashi) नाव येताच तुमच्या मनात पहिला विचार येतो तो बाबा विश्वनाथांचा. पण गेल्या दोन वर्षांत काशीमध्ये बरेच काही बदल झाले आहेत. या बदलांचा परिणाम बनारसच्या अर्थव्यवस्थेवर (Economy) दिसून येत आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर सुरु होऊन दोन वर्षे झाली आहेत. या दोन वर्षांत काशीतील पर्यटकांची संख्या 13 कोटींच्या पुढे गेली आहे.काशीत वार्षिक उलाढाल 20,000 कोटींच्या पुढे गेली आहे. काशीमध्ये (kashi) विमानतळापासून रेल्वे आणि रोडवेपर्यंत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. 


काशी बनतयं पर्यटन केंद्र 


तज्ज्ञांच्या मते काशी हे पर्यटन केंद्र म्हणून वेगाने प्रगती करत आहे. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये सुमारे 4.5 कोटी पर्यटकांनी काशीला भेट दिली होती. यावर्षी ही संख्या 5 कोटींच्या पुढे जाईल, तर धर्मशाळा आणि हॉटेलच्या खोल्या देखील सामान्यतः रिकाम्या राहणार नाहीत.एकट्या बनारसमध्ये फक्त 1000 नोंदणीकृत हॉटेल्स आहेत.


महसुलात जलद वाढ


काशी विश्वनाथ धामने बनारसच्या अर्थव्यवस्थेला नवी गती दिली आहे. या धाममुळं सरकारच्या महसुलात 65 टक्क्यांची जोरदार वाढ नोंदवण्यात आली आहे. टुरिझम वेल्फेअर असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी येथील वार्षिक उलाढाल सुमारे 250 कोटी रुपये होती, ती यंदा 300 ते 350 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. काशीच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसह, कारागीर, हॉटेल क्षेत्र, लाकूडकाम, पर्यटन यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळत आहे. त्याचबरोबर बनारसी साडीच्या व्यवसायातही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.


अशा प्रकारे बनारसची अर्थव्यवस्था बदलली


आणखी एक काशी विश्वनाथ धाम पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले आहे. त्याचवेळी, काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या निर्मितीमुळे बनारसच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे. येथील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या 9 वर्षांत पर्यटकांच्या संख्येत सुमारे 10 पटीने वाढ झाली आहे. या वाढीचा फायदा येथील व्यावसायिकांनाही झाला. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. केवळ कॉरिडॉरमध्ये येणाऱ्या पर्यटकांमुळे अर्थव्यवस्थेला वर्षाला 8 ते 10 हजार कोटी रुपयांचा वाटा मिळत आहे.


लोकांना रोजगार मिळत आहे


काशीमध्ये रोजगाराच्या बाबतीत बोलायचे झाले तर पर्यटन क्षेत्राला सर्वाधिक चालना मिळाली आहे. आकडेवारीनुसार, या क्षेत्रातील रोजगारामध्ये 34 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर बनारसी कापड व्यापारी, हॉटेलमालक, बोटीचालक, पांडे-पुजारी, ट्रॅव्हल एजंट, ई-रिक्षा, ऑटो आणि टॅक्सी चालक, पूजा साहित्य विक्रेते, पथारी विक्रेते, छोटे व्यापारी यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. 


छोट्या व्यावसायिकांनाही फायदा


या भागात पायाभूत सुविधांचा विकास होत असल्याने छोट्या व्यावसायिकांनाही फायदा होत आहे. मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असल्याचा फायदा छोट्या व्यावसायिकांना होत आहे. घाट व्यवस्थापनाचे काम वाढल्याने येथे लोकांना रोजगारही मिळत आहे. फुलांच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षभरात 40 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


अदानी समूह 'या' ठिकाणी करणार  8700 कोटींची गुंतवणूक, 10,000 लोकांना मिळणार रोजगार