Money Transferred : घरखर्च भागवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या पत्नीला घरखर्चाच्या नावावर काही रक्कम देतो. तुम्ही देखील घरातील रेशन, भाजीपाला, दुधाचे बिल, कागदाचे बिल, पाण्याचे बिल, मोलकरणीचा पगार अशा प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी दर महिन्याला तुमच्या पत्नीला पैसे देत असाल तर त्यावर कर आहे का? यासाठी आयकर नियम काय आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


आजकाल प्रत्येकजण प्रत्येक लहान-मोठ्या पेमेंटसाठी डिजिटल पेमेंट मोड वापरतो. घरी बनवलेल्या भाज्या असोत किंवा रेशन असो, लोक ते ऑनलाइन खरेदी करत आहेत किंवा किमान त्याचे पैसे ऑनलाइन देत आहेत. त्याचवेळी, अनेक लोक आहेत जे घरखर्चासाठी पत्नीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतात. आता घरातील रेशन, भाजीपाला, दुधाचे बिल, कागदाचे बिल, पाण्याचे बिल, मोलकरणीचा पगार अशी प्रत्येक छोटी-मोठी कामे जोडली तर दर महिन्याला घरखर्चाच्या नावाने चांगली रक्कम पत्नीच्या खात्यात पोहोचते. त्यामुळं लोकांच्या मनात प्रश्न आहे की, यासाठी पत्नीलाही कर भरावा लागणार का? तुमच्याही मनात हाच प्रश्न असेल की तुम्ही कर न भरल्यास तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळेल का? 


बायकोला टॅक्स भरावा लागेल का?


जर तुम्ही तुमच्या पत्नीला घरखर्चासाठी पैसे हस्तांतरित केले तर पत्नीवर कोणताही कर आकारला जाणार नाही. याचा अर्थ आयकर विभागाकडून पत्नीविरोधात कोणतीही नोटीस येणार नाही. याचे कारण म्हणजे पतीच्या पैशावर कर आकारला जात आहे आणि एकाच पैशावर दोनदा आयकर लावता येत नाही. घरखर्चासाठी पत्नीला दिलेला पैसा पतीची कमाई मानला जाईल आणि त्यावर कर आकारला जाईल.


तुम्ही तुमच्या घरगुती खर्चासाठी गुंतवणूक केल्यास कर नियम काय आहेत?


आता पतीकडून पत्नीला घरखर्चासाठी मिळालेले पैसे कुठेतरी गुंतवले तर त्यातून मिळणारे उत्पन्न करपात्र ठरेल. म्हणजेच, जर पत्नीने घरखर्चानंतर उरलेले पैसे एफडीमध्ये जमा केले किंवा शेअर मार्केटमध्ये किंवा इतर कोठेही गुंतवले आणि त्यातून काही पैसे कमावले तर ते पत्नीचे उत्पन्न मानले जाईल. पत्नीला देखील सर्व कर सवलतींचा लाभ मिळेल, परंतू, तिला आयटीआर भरावा लागेल.


पत्नीला दिलेला पैसा म्हणजे भेट


आयकर कायद्यातून पाहिले तर पत्नीला दिलेले पैसे हे गिफ्ट मानले जाते. पत्नी नातेवाईकांच्या श्रेणीत येते, त्यामुळे पत्नीला दिलेल्या पैशावर कोणताही कर नाही. पतीला देखील यावर कोणतीही कर सूट मिळणार नाही. याचा अर्थ असा की पत्नीला कर भरावा लागणार नाही आणि त्याचवेळी पतीचे कर दायित्व राहील आणि त्याला त्याच्या स्लॅबनुसार कर भरावा लागेल.


महत्त्वाच्या बातम्या: