FD and Loan : पैशांची गरज केव्हाही अचानक उद्भवू शकते. अशा परिस्थितीत फक्त तुमची बचतच कामी येते. पण जर तुमच्याकडे पुरेशी बचत नसेल तर? अशा वेळी एकतर एफडी (FD) तोडून गरज भागवली जाते किंवा कर्जाची (Loan) मदत घेतली जाते. पण दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय चांगला ? असा प्रश्न तुम्हाला पडला तर. तुम्ही जर तुमची FD तोडणार असाल, तर FD तोडणे काही योग्य आहे का? काही बाबतीत त्यामुळं मोठे नुकसान होऊ शकते.
तुम्ही FD वर देखील कर्ज घेऊ शकता का?
एफडी तोडण्यापेक्षा तुमच्या एफडीवर कर्ज घेणे चांगले. अनेक बँका ही सुविधा देत आहेत. जे तुम्हाला पर्सनल लोनपेक्षा स्वस्त पडेल. परंतू कर्ज घेतल्यावर एफडीवरील व्याजापेक्षा एक किंवा दोन टक्के जास्त व्याज द्यावे लागेल. या पर्यायात तुमचा कर्जाचा बोजा वाढला असला तरी एफडीमध्येही मोठी बचत होईल. त्यामुळं हा पर्याय अधिक चांगला मानला जाऊ शकतो.
दंड भरावा लागेल
समजा एखाद्या व्यक्तीने त्याची पाच वर्षांची एफडी मुदतीपूर्वीच तोडली. तर ज्यावर वार्षिक 7 टक्के व्याज दिले जात आहे. अशा परिस्थितीत, मुदतीपूर्वी एफडी तोडल्याबद्दल तुम्हाला दंड भरावा लागेल. अनेक बँका यासाठी शुल्क आकारतात. अशा परिस्थितीत हा पर्याय तुमच्यासाठी तोट्याचा ठरू शकतो.
FD तोडणे कधी योग्य?
जेव्हा FD बनवून फक्त काही महिने झाले असतील आणि तुम्हाला खूप पैशांची गरज असेल, तेव्हा तुम्ही त्या वेळी FD तोडू शकता. परंतू जर एफडीच्या रकमेच्या 20 ते 30 टक्क्यांची रक्कम आवश्यक असेल तर कर्ज घेणे अधिक योग्य ठरेल. FD च्या किमान 70 टक्के रक्कम आवश्यक असेल तेव्हाच FD तोडण्याचा निर्णय घ्यावा.
महत्त्वाच्या बातम्या: