Salman Khan Angry At Papps: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) हा काल (19 डिसेंबर) त्याच्या धाकटा भाऊ सोहेल खानचा (Sohail Khan) 53 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. यादरम्यान सलमान खानचा एक व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा पापाराझीवर भडकलेला दिसत आहे.


पापाराझीवर भडकला सलमान


सोहेल खानचा 19 डिसेंबरला 53 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच्या बर्थ-डेनिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोहेलचा भाऊ सलमान खान हा सोहेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सलीम खान, हेलन, सलमा खान, अर्पिता खान आणि आयुष शर्मा, अलविरा खान, अतुल अग्निहोत्री आणि त्यांची मुलगी अलिझेह अग्निहोत्री यांनी देखील सोहेलच्या पार्टीला हजेरी लावली. या पार्टीनंतर सलमान हा  त्याच्या कार जवळ आला. त्यावेळी तो पापाराझीवर भडकला. यावेळी सलमान डोळे मोठे करुन पापाराझीला म्हणाला,  'पीछे हटो सब.'


पाहा व्हिडीओ:






नेटकऱ्यांच्या कमेंट्स


सलमान खानच्या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या. एका युझरनं कमेंट केली, "सेलिब्रिटी देखील माणसेच असतात हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "तो डाऊन टू अर्थ व्यक्ती आहे त्याला जज करु नका. खूप गर्दीमुळे चिडचिड होते."


सलमान खानचे चित्रपट


काही दिवसांपूर्वी सलमानचा टायगर-3 हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांनी देखील काम केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन  मनीष शर्मा  यांनी केलं. टायगर व्हर्सेस पठाण या चित्रपटामधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, असं म्हटलं जात आहे. सलमान हा सध्या 'बिग बॉस 17' या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोचं तो सूत्रसंचालन करतो. आता सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ट्युबलाईट, किक, बजरंगी भाईजान, दबंग  या सलमानच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


संबंधित बातम्या:


Salman Khan: "मी तुम्हाला जन्म दिलेला नाही, तुमच्या मुर्खपणात मला इंटरेस्ट नाही!"; सलमान खानची का 'सटकली'?