Gold-Silver Prices today: मागील चार दिवसात तोळ्यामागे साधारण 2000 रुपयांची वाढ झाल्यानंतर आता पितृपक्षाला सुरुवात होताच सोन्याचांदीचा भाव गडगडला आहे. गणेशोत्सव आता संपला असून पितृपक्ष सुरु झाले आहे. तोळ्यामागे सोन्याला किती रुपये द्यावे लागतायत? चांदीचा भाव किती झालाय? जाणून घेऊया.
द बुलियन मार्केटनुसार, 24 कॅरेट सोन्याला 10 ग्रॅमसाठी 73,350 रुपये भाव झाला आहे. मागील आठवड्यापेक्षा हा भाव अधिक असून कालच्यापेक्षा साधारण 200 रुपयांनी हा भाव उतरला आहे. तर चांदीचा दर एका किलोमागे 89,230 रुपये झाला आहे. आठवड्याभरापेक्षा हा दर अधिक असून मागील एका दिवसाच्या तुलनेत हा दर कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
तोळ्यामागे काय चाललेत दर?
सोन्याला दहा ग्रॅमसाठी 73,350 रुपयांचा भाव झाला असून तोळ्यामागे 22 कॅरेटला 78,425 रुपये मोजावे लागत आहेत. चांदीला किलोमागे 88,500 रुपये भाव द्यावे लागत आहे.
तुमच्या शहरात सोन्याचे भाव काय?
मुंबई- सोनं- 73,210 प्रति 10 ग्रॅम
पुणे- सोनं- 73,210 प्रति 10 ग्रॅम
औरंगाबाद- सोनं- 73,240 रु प्रति 10 ग्रॅम
नाशिक- सोनं- 73,240 रु प्रति 10 ग्रॅम
नागपूर- सोनं - 73,240
सोलापूर- 73,240 प्रति 10 ग्रॅम
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ
एका बाजूला राष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं लोकांना सोन्याची खरेदी करणं परवडत नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या काळात आमकी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात मौल्यवान धातूंच्या (सोने आणि चांदी) किंमती वाढू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. येत्या काही दिवसांत अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केली जाऊ शकते, त्याचा फायदा सराफांना होऊ शकतो. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात नवीन मागणी येऊ शकते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशात खामगाव येथील चांदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. आता खामगाव येथील बाजारपेठेत चांदी 91000 रू प्रति किलो तर सोने 75200 रू प्रति तोळे मिळत आहे. मात्र ही दरवाढ दिवाळी पर्यंत स्थिरावेल अशी माहिती चांदीच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा:
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल?