Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (Ola Electric Mobility Ltd) ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारावर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. 17 सप्टेंबर रोजी या कंपनीच्या शेअरने शेअरबाजारावर गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले. भविष्यातही हा शेअरची स्थिती अशीच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे दोन परदेशी ब्रोकरेज हाऊसेसने ओला इलेक्ट्रिक या शेअरला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
गोल्डमॅन सॅक्सने काय सल्ला दिला?
ओला इलेक्ट्रिक या शेअरमध्ये 17 सप्टेंबर रोजी एकूण 9.63 टक्क्यांची तेजी आली. सध्या हा शेअर 117.96 रुपयांवर आहे. आज 18 सप्टेंबर रोजीदेखील हा शेअर चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन परदेशी ब्रोकरेज हाऊस गोल्डमॅन सॅक्सने (Goldman Sachs) हा शेअर 160 रुपयांचे टार्गेट समोर ठेवून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गोल्डमॅन सॅक्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात भविष्यात इलेक्ट्रिक टू-व्हिलरची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेअरमध्ये वाढ होऊ शकते. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड या कंपनीचा 2023-24 ते 2029-30 या काळात महसूल 40 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता या ब्रोकरेज हाऊसने व्यक्त केली आहे.
145 रुपयांचे ठेवावे टार्गेट
बीओएफए सिक्योरिटीज (BofA Securities) या ब्रोकरेज हाऊसनेही ओला इलेक्ट्रिक हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 145 रुपयांचे टार्गेट ठेवावे असे या कंपनीने म्हटले आहे. ही कंपनी देशातील सर्वांत मोठी इलेक्ट्रक टू-व्हिलरची निर्मिती करणारी कंपनी आहे. इलेक्ट्रिक टू-व्हिलरच्या एकूण बाजारापैकी साधारण 40 टक्के बाजार ओला इलेक्ट्रिक या कंपनीने व्यापलेला आहे, असे बीओएफए सिक्योरिटीजने म्हटले आहे. सध्या पेट्रोलवर चालणाऱ्या स्कुटरपेक्षा कमी किमतीवर ओला इलेक्ट्रिकची स्कुटर खरेदी करता येते.
55 टक्क्यांनी शेअर वाढला
सध्या ब्रोकरेज हाऊस ओला इलेक्ट्रिकचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत असल्यामुळेच सध्या या शेअरमध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे. एचएसबीसी (HSBC) या ब्रोकरेज हाऊसनेदेखील 140 रुपयांचे टार्गेट देत या कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीने आतापर्यंत तीन इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केलेल्या आहेत. त्यामुळेच इलेक्ट्रिक मोटारसायकल व्हेइकल सेगमेंटमध्ये शिरकाव केल्यामुळे या कंपनीला आणखी फायदा होण्याची शक्यता आहे. ओला इलेक्ट्रिक मोबिलीटी ही कंपनी ऑगस्ट 2024 मध्ये आयपीओ घेऊन आली होती. शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले होते. या आयपीओमध्ये प्रत्येक शेअरची इश्यू प्राईज साधारण 76 रुपये होती. पण शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच हा शेअर साधारण 55 टक्क्यांची वाढला होता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
आयफोन 16 साठी ॲपलची भन्नाट ऑफर! तब्बल 25000 स्वस्त मिळू शकतो फोन; जाणून घ्या नेमकं कसं?
15000 चे थेट झाले 25000 रुपये! बजाज फायनान्सनंतर आता पीएन गाडगीळच्या IPO ची हवा
बिग बिलियन डेज पुन्हा आले! आयफोनपासून ते टीव्हीपर्यंत मोठी सूट मिळणार; जाणून घ्या सविस्तर