Buffalo News : भारत (India) हा कृषिप्रधान देश आहे, हे सर्वांना माहीतच आहे. आपल्या देशात खाद्यपदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांना खूप मागणी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का देशात सर्वाधिक दूध देणारी म्हशीची (buffalo) जात कोणती आहे? नसल्यास तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज सांगणार आहोत. त्याचबरोबर या म्हशीचे संगोपन करुन तिचे दूध विकून तुम्ही कसे श्रीमंत होऊ शकता याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
मुर्राह म्हैस दिवसाला सरासरी 25 ते 30 लिटर दूध देते
मुर्राह ही भारतातील सर्वाधिक दूध उत्पादक म्हशीची जात मानली जाते. ही म्हैस दिवसाला सरासरी 25 ते 30 लिटर दूध देते. ही म्हैस उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाळली जाते. मुर्राह म्हशीच्या दुधात फॅट आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्याचे दूध प्यायल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि फॅट मिळते. या म्हशीच्या दुधाचा उपयोग दही, ताक, तूप आणि लोणी यांसारखे अनेक प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी देखील केला जातो.
दररोज 1000 ते 1500 रुपये कमवू शकता
मुर्राह म्हशीची किंमत 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे. या म्हशीचे संगोपन करणे खूप फायदेशीर आहे. एक मुर्राह म्हैस एका दिवसात सुमारे 25 लिटर दूध देते. ज्यानुसार तुम्ही दररोज 1000 ते 1500 रुपये कमवू शकता.
हरियाणा, दिल्ली, आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात या म्हैशी
हरियाणा, दिल्ली, आणि पंजाबमधील रोहतक, हिसार, जिन्द आणि करनाल या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुर्रा म्हशी आढळतात. तसेच परदेशातही इटली, बल्गेरिया, इजिप्त इत्यादी देशात या म्हशी आढळतात. हरियाणामध्ये मर्रा म्हशीला काला सोना असेही म्हणतात. दुधामध्ये चरबी उत्पादनासाठी मुर्रा ही उत्तम जात आहे. त्याच्या दुधात 7 टक्के चरबी आढळते.
या जातीच्या म्हशीही जास्त दूध देतात
मुर्राह म्हशीबरोबरच मेहसाणा म्हैस देखील एका दिवसात 20 ते 30 लिटर दूध देते. ही म्हैस मुख्यतः गुजरात आणि महाराष्ट्रात आढळते. ही म्हैस दोन्ही राज्यात पाळली जाते. दुसरीकडे, महाराष्ट्रात आढळणारी पंढरपुरी म्हशीची जातही तिच्या दूध उत्पादन क्षमतेसाठी ओळखली जाते. सुरती म्हशींचे दूध उत्पादनही चांगले आहे.
देशात मोठ्या प्रमाणावर पशुपालनाचा व्यवसाय
आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. शेतीला जोडधंदा असणारा प्रमुख व्यवसाय म्हणून पशुपालनाकडं बघितलं जातं. पशुपालनाच्या माध्यमातून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. मोठ्या प्रमाणात दूध देणाऱ्या गाई-म्हशींच्या नवनवीन जाती आहेत. या जातींचं शेतकरी संगोपन करुन चांगलं उत्पन्न मिळवतायेत. गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला मोठी मागणी आहे आणि दरही जास्त आहे. त्यामुळं तुम्ही जर मुर्राह म्हशीचं संगोपन केलं तर यातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या: