Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) उद्या सादर होणार असून या माध्यमातून विकास आणि रोजगार निर्मितीवर भर देणारा अर्थसंकल्प असल्याची माहिती अर्थतज्ञ विनायक गोविलकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर शेती क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात येतील असा विश्वासही गोविलकर यांनी व्यक्त केला आहे. 


दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सामान्यांना, उद्योगजगताला, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची यांसह सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचलेली असते.  या बजेटला विशेष अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे कोविड संपून एक वर्ष होऊन गेले आहे. ज्या पद्धतीने अर्थचक्राला गती मिळावी यासाठी या एका वर्षात चांगला गिअर अप मिळाला असल्याचे गोविलकर म्हणाले.  


नाशिक येथील अर्थतज्ञ विनायक गोविलकर यांनी यंदा होणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत काही महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तविली आहे. ते म्हणाले, "जागतिक स्तरावर मंदीचे वारे वाहत आहेत. त्या दृष्टीने भारताची अर्थव्यवस्था थोडी स्थिर आहे. असं जगातल्या सर्वच वित्तीय संस्थांचे म्हणणे आहे. तसेच यापुढील बजेट हे निवडणुकीच्या आधीचं बजेट असणार आहे. त्यामुळे ते वोट ऑन अकाउंट बजेट असेल पूर्ण बजेट नसेल. त्यामुळे याच बजेटमध्ये सरकारला विविध घोषणा करण्याची संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले. 


एका बाजूला जगातील अनेक देशांना मंदीने ग्रासले आहे. मात्र भारतात परिस्थिती उलट आहे. भारताची अर्थव्यवस्था चांगली असून त्यासाठी अर्थ संकल्पातून सामान्य गुंतवणूकदार म्हणजेच सामान्य ग्राहकांना दिलासा द्यावा लागणार आहे. कारण पुढच्या बजेटमध्ये ते देता येणे शक्य होणार नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना भारत सरकारने पाच ट्रिलियनचे स्वप्न साकारण्याचे ठरविले आहे. याची पूर्तता करण्यासाठी सरकाराला काहीतरी करावे लागणार आहे. 


Union Budget 2023 :  भारताचा विकासदर कुठे? 


अमेरिकेचा विकासदर 1 टक्क्यांच्या खाली असून युरोप शून्य टक्क्यांच्या खाली आहे तर चीनची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. ज्या अर्थव्यवस्था मजबूत आहेत त्यामध्ये भारत आता पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी आहे. पण जागतिक विकासाच्या दृष्टीने पाहिलं तर आपण एक किंवा दोन नंबरवर असायला हवं, जागतिक स्थितीच्या तुलनेत आपली स्थिती चांगली राहील असे वाटते, असे मत गोविलकर यांनी व्यक्त केले. 


Union Budget 2023 :  यंदाच्या बजेटमध्ये काय काय? 


यंदाच्या बजेटमध्ये सर्वाधिक गुंतवणूक ही इन्फ्रा स्टक्चरमध्ये येईल. यातील गुंतवणूक दीर्घकालीन विकासासाठी आवश्यक असते. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळे उपाय सरकार करत आहे. एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला रोजगार निर्माण होणार आहे. उद्योगांना इन्सेटिव्ह आतील त्यातही देशातील लघू आणि मध्यम उद्योगांना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. तसेच शेतीबाबत महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत शेतीच्या उत्पादनावर सर्व सरकारे भर देत आहेत. त्यावर हे सरकार गेल्या बजेटमध्ये आताच्या बजेटमध्ये साठवणूक आणि विपणन यावर भर देण्याची शक्यता असून त्यानुसार किसान रेल्वे सारख्या योजना वाढीस लागतील, असेही ते म्हणाले. शेतीमालाची ऑनलाईन विक्री व्यवस्थेला बळकटी देण्याचे काम सरकारकडून केले जाईल. सामान्य जनता म्हणून इन्कम टॅक्सवर काम करता येईल. एक्सझेमशन लिमिट वाढवणार अशी परिस्थितीची वाटते आहे. एटीसी खाली जे डिडक्शन आहे, ते दीड लाखांपर्यत मर्यादित केले आहे, त्याच्यामध्ये थोडासा बदल होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. तसेच घर, घराची खरेदी, त्यावरील व्याज, रीपेमेन्ट हफ्ता यांच्यात सवलत मिळण्याची शक्यता असून उद्योगांच्या निर्यातीवर सवलत मिळण्याची शक्यता असल्याचे गोविलकर यांनी सांगितले.