Union Budget 2022 : देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


आज सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 9 वाजता आपल्या टीमसोबत अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी रवाना होतील. वित्त मंत्रालयाच्या महासंचालकांनी दिलेल्या (मीडिया आणि कम्युनिकेशन्स) माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील.


प्रस्थापित परंपरेनुसार, भारताच्या राष्ट्रपतींना सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रपती कोणतेही बदल सुचवत नसल्यामुळे ही बैठक नेहमीचीच असते. परंतु संसदेत अधिकृतपणे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते.


राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षेत मंत्रिमंडळाला संक्षिप्त स्वरुपात अर्थसंकल्पाबाबत माहिती देतात. अर्थ मंत्रालयाकडून अर्थसंकल्पाबाबत गोपनियता पाळली जाते. अर्थमंत्र्यांनी आपले भाषण सादर करण्यापूर्वी अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत गुप्तता राखणं बंधनकारक असतं. 


आज अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प सादर करणार 



  • अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 8.15 वाजता आपल्या निवास्थानाहून रवाना होतील

  • निर्मला सीतारमण आणि अर्थसंकल्प तयार करणारी टीम सकाळी 9 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतील. 

  • राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर सकाळी 10 वाजता निर्मला सीतारमण बजट ब्रीफ केससह संसदेत दाखल होतील. संसद भवनाच्या पायऱ्यांवर फोटोसेशल होईल.  

  • त्यानंतर संसद भवनात केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक पार पडेल, ज्यामध्ये अर्थसंकल्पाला औपचारिकरित्या मंजुरी देण्यात येईल. 

  • सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर होईल आणि अर्थमंत्री भाषण करतील 

  • बजेट स्पीचनंतर पंतप्रधान मोदी अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर वक्तव्य देतील. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha