मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024 ) सादर केला. त्यामध्ये त्यांनी महिला, शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरपंप योजना सुरू करण्याची घोषणा अजित पवारांनी केली. तसेच एक लाख महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असंही अजित पवारांनी सांगितलं.


महिलांसाठी काय घोषणा? 



  • राज्यातील एक लाख महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

  • महिलांना रोजगाराच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यासाठी पाच हजार पिंक रिक्षा दिल्या जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

  • राज्यातील अंगणवाडी सेविका यांची 14 लाख पदं भरण्यात आली आहेत. 


शेतकऱ्यांसाठी काय घोषणा?


- शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरपंप योजना सुरू केली जाणार आहे.
- विदर्भात सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
- ⁠नुकसान झालेल्या 44 लाख  शेतकऱ्यांना 3 हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
- शेळी मेंढी वराह योजने अंतर्गत 129 प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. येत्या 3 वर्षात 155 प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येईल त्यासाठी 15 हजार कोटी रुपयांची गरज आहे.
- वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाव्दारे 3.71 लक्ष हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ.
- खारभूमी विकास कार्यक्रमांतर्गत 113 कोटी रुपयांची तरतूद.
- बळीराजा जलसंजीवनी योजनेत 46 प्रकल्प  पूर्ण  झाले असून मार्च 2025 पर्यंत आणखी 16 प्रकल्प पूर्ण होणार.
- 39 सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करुन 2 लाख 34 हजार हेक्टर सिंचन क्षमता स्थापित करणार.
- “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” अंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 691 कोटी 47 लाख रुपये.
- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत 1 लाख शेतकऱ्यांना सौर उर्जा कुंपणासाठी अनुदान.


इतर महत्त्वाच्या घोषणा


- ऊर्जा विभागासाठी अर्थसंकल्पात 11 हजार 934 कोटींची तरतूद, राज्य सरकारचं 7 हजार मेगावॅट ऊर्जानिर्मितीचं लक्ष्य आहे.
- राज्यातील 37 हजार आंगणवाडींना सौर ऊर्जा.
- 40 टक्के अपारंपारिक उर्जा राबविणार आहे.
- ⁠37 हजार आंगणवाडीना सौर उर्जा दिली जाणार आहे.
- कोल्हापूरसांगलीत पूर रोखण्यासाठी 2300 कोटी रूपयांची कामे केली जाणार. 
- दिव्यांगांसाठी 34 हजार घरकुल, अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार
- 34 हजार घरकुल दिव्यांगासाठी बांधली जाणार.
- ⁠नागपुरमध्ये राज्य क्रीडा संकुलाचा नाहीदर्जा करण्यात आला आहे .
- राज्यात 50 पर्यटन ठिकाणची निवड करण्यात आली आहे.
- ⁠लोणावळा या ठिकाणी स्काय वॉक प्रकल्प उभारला जाईल.
- ⁠आयोध्या आणि जम्मू काश्मीर या ठिरणी महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
- ⁠यासाठी मोक्याची जागा घेण्यात आली आहे.
- वढू येथील स्मारकाला पावनेतिनशे कोटी रुपये देण्यात आले आहेत.
- दिल्ली , गोवा आणि बेळगाव या ठिकाणी मराठी भाषा भवन उभारल जाणार.


ही बातमी वाचा: