Budget 2023: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (India Budget 2023) 31 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. यासंदर्भात संसदेचे कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी ट्वीट केलं आहे. यंदा संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Parliament Budget Session) 31 जानेवारी 2023 पासून सुरू होणार असून 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचं कामकाज 66 दिवस सुरू राहणार आहे. तर मधल्या काळात काही दिवसांचा ब्रेक असेल. 


अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण 66 दिवस सुरू राहणार आहे. ते दोन टप्प्यात चालणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात वित्त विधेयक मंजूर होईल.


संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरू होणार आहे. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवतील. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरही चर्चा होणार आहे.






संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट केलंय की, "अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. यादरम्यान विविध मंत्रालयांशी संबंधित संसदीय स्थायी समिती अनुदानाच्या मागणीवर चर्चा करू शकतील आणि मंत्रालये, विभागांशी संबंधित अहवाल तयार करू शकतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे."






अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात लोकसभा आणि राज्यसभेत जूरमं होणाऱ्या वित्त विधेयकावर चर्चा होणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Union Budget 2023: अर्थसंकल्पाकडून ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अपेक्षा; रेल्वे प्रवास दरांत सवलत मिळणार?