Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांना फार मोठा दिलासा मिळाला नाही. कररचनेत कोणताही बदल झाला नाही. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मागील काही अर्थसंकल्पीय भाषणाच्या तुलनेत यंदाचे भाषण हे कमी कालावधीचे भाषण ठरले. 


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषण 90 मिनिटांमध्ये संपवले. वर्ष 2020 मध्ये निर्मला सीतारमण यांनी सर्वाधिक वेळेचे अर्थसंकल्पीय भाषण दिले होते. या दरम्यान त्यांनी दोन तास 40 मिनिटांचे भाषण केले होते. 


निर्मला सीतारमण यांनी यंदा केलेले अर्थसंकल्पीय भाषण कमी कालावधीचे ठरले आहे. आतापर्यंत त्यांनी चार वेळेस अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये सर्वाधिक कालावधीचे भाषण 2020 मध्ये केले होते. वर्ष 2020 मध्ये दोन तास 40 मिनिटांचे भाषण केले होते. तर, त्याआधी 2019 मध्ये त्यांनी दोन तास 17 मिनिटे अर्थसंकल्पीय भाषण केले होते. यंदाचे अर्थसंकल्पीय भाषण सर्वाधिक वेळेचे होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, निर्मला सीतारमण यांनी आपले अर्थसंकल्पीय भाषमण 90 मिनिटात संपवले. 


यंदाचाही अर्थसंकल्प कागदविहीन म्हणजे डिजिटल असणार होता. अर्थसंकल्पाच्या मोजक्याच प्रतींची छपाई करण्यात आली होती. कोरोना महामारीमुळं आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशातील कर प्रस्ताव आणि प्रस्तुती तसेच वित्तीय विवरण अशा सर्व प्रकारच्या कागदपत्रांची छपाई होणार नाही.  


निर्मला सीतारमण मुळच्या तमिळनाडूतील मदुराई येथील असून, त्यांनी भाजपच्या प्रवक्त्या ते अर्थमंत्री होण्यापर्यंतचा मोठा पल्ला गाठला आहे. कोरोना संकटात देशातील जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यापासून ते आर्थिक सुधारणांपर्यंत निर्मला सीतारमण यांनी सर्वसामान्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: