नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी महिला तसेच मुलांना केंद्रस्थानी ठेवून एक महत्वाची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी असे सांगितले आहे की,  2 लाख अंगणवाड्यांचे अपग्रेडेशन केले जाणार आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी असं म्हटलं आहे की, “आमच्या सरकारने मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 फायदे प्रदान करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या योजनांमध्ये व्यापक सुधारणा केल्या आहेत. पुढे त्या असंही म्हणाल्या की, “'महिलांचे महत्त्व ओळखून नारी शक्ती', महिला आणि मुलांचा एकात्मिक विकास करण्यासाठी तीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी बालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी 2 लाख अंगणवाड्यांचे अपग्रेडेशन केले जाणार आहे. 


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या बजेट 2022 मध्ये संसदेत आणि बूस्टर्सद्वारे महिला आणि मुलांचे सक्षमीकरण करण्यावर विशेष भर दिला आहे. मुलांची बौद्धिक, सामाजिक आणि आर्थिक वाढ होईल या दृष्टीने महत्वपू्र्ण निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच, बालकांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असून त्यांना आणि सुधारित अंगणवाड्यांच्या दिशेने प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे 2022 च्या अर्थसंकल्पात मिशन शक्तीचे बळकटीकरण आणि विस्तार ठळकपणे दिसून आला.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha