Budget 2021: मद्यप्रेमींना झटका नाही! 100 टक्के अधिभारानंतरही वाढणार नाहीत मद्याचे दर, काय आहे कारण?
एबीपी माझा वेब टीम | 01 Feb 2021 10:59 PM (IST)
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मद्यपेयाच्या दरांवर 100 टक्के कृषी अधिभार लावण्याचा निर्णय़ घेण्याची घोषणा करण्यात आली. ज्यानंतर मद्यप्रेमींना या दरवाढीचा फटका बसणार अशा चर्चाही झाल्या.
नवी दिल्ली : यंदाच्या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना काळातील असंख्य संकटानंतर देशाला पूर्ववत प्रगतीच्या आणि आर्थिक विकासाच्या मार्गावर आणण्याकडेच अर्थमंत्र्यांचा कल दिसून आला. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मद्यपेयाच्या दरांवर 100 टक्के कृषी अधिभार लावण्याचा निर्णय़ घेण्याची घोषणा करण्यात आली. ज्यानंतर मद्यप्रेमींना या दरवाढीचा फटका बसणार अशा चर्चाही झाल्या. मद्याच्या दरांवर लावण्यात आलेल्या या अधुभारामुळं मद्यप्रेमींना झटका मिळणार अशाच चर्चांना उधाण आलं. पण, अभ्यासक आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मद्याच्या दरांमध्ये वाढ होणार नाही. यामागे एक अत्यंत महत्त्वाचं कारणही आहे. दरवाढ न होण्याची शक्यता, कारण आहे.... एकिकडे मद्याच्या दरांवर 100 टक्के कृषी अधिभार लावण्यात आला असला तरीही दुसरीकडे मात्र या उत्पादनांसाठीच्या कस्टम ड्यूमध्ये अर्थात सीमा शुल्कामध्ये मात्र कपात करण्यात आली आहे. यापूर्वी आयात केल्या जाणाऱ्या 80 टक्के अल्कोहोलचं प्रामाण असणाऱ्या मद्यावर 150 टक्के सीमा शुल्क आकारण्यात येत होतं. पण, आता मात्र यामध्ये लक्षणीय घट करण्यात आली आहे. Valentine Week 2021: 'व्हॅलेंटाईन्स वीक'मध्ये 'त्या' खास व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी सज्ज आहात ना? परिणामी यापुढं सरकार या मद्यावर 50 टक्के सीमा शुल्कच आकारणार आहे. त्यामुळं एक साधं सरळ गणित असं आहे की सरकारनं अधिभाराच्या रुपात जी दरवाढ केली तेच दर सीमा शुल्कात कपात करुन कमीही केले. त्यामुळं तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मद्याच्या दरांमध्ये यामुळं फारसा बदल झालेला आढळणार नाही.