Valentine Week 2021: 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये 'त्या' खास व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी सज्ज आहात ना?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App8 फेब्रुवारी, प्रपोझ डे (Propose Day) - या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी प्रेम व्यक्त केलं जातं. माझा होशील ना, किंवा माझी होशील ना असं विचारत साथीदाराकडे प्रेमाची कबुली दिली जाते.
12 फेब्रुवारी, हग डे (Hug Day) - प्रिय व्यक्तीला मारलेली एक साधी मिठीही खूप काही सांगून जाते. मुळात कोणत्याही गोष्टीपेक्षा त्या व्यक्तीचं अस्तित्वंच इथं महत्त्वाचं असतं.
10 फेब्रुवारी, टेडी डे (Teddy Day) - प्रेमात असणाऱ्या अनेकांसाठी टेडी म्हणजे अगदी खास. पहिलंवहिली भेटवस्तू म्हणून अनेकांचीच या पर्यायाला पसंती.
Valentine Week 2021 फेब्रुवारी महिना सुरु झाला की चाहूल लागते ती अशा एका दिवसाची ज्याची प्रेमी युगुलं आतुरतेनं वाट पाहत असतात. प्रेमच्या त्यांच्या या प्रवासात या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्वं, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. किंबहुना हा एक दिवस नव्हे तर संपूर्ण आठवडात प्रेमी युगुलांसाठी खास असतो. कारण हा आठवडा असतो, व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week). दरवर्षीप्रमाणंच यंदाही हा आठवडा 7 ते 14 फेब्रुवारी या काळात साजरा केला जाणार आहे. याची रोझ डे पासून सुरु होणाऱ्या या आठवड्याची सांगता होणार आहे, व्हॅलेंटाईन डे ला.
11 फेब्रुवारी, प्रॉमिस डे (Promise Day) - जीवनात येणाऱ्या प्रत्येक वळणावर एकमेकांची साथ देण्याची वनचं या दिवशी अनेकजण देतात. मुळात या वचनांमागची भागनाच नात्यांना आणखी दृढ बनवते.
9 फेब्रुवारी, चॉकलेट डे (Chocolate Day) - आठवड्यातील तिसरा दिवस असतो चॉकलेट डे. नात्यात कायमच गोडवा टिकून रहावा यासाठीचं प्रतीक म्हणून या दिवशी अनेक युगुलं एकमेकांना चॉकलेट देतात.
13 फेब्रुवारी, किस डे (Kiss Day) - नात्याला एका वेगळ्या वळणावर देत किस डे, सुद्धा या व्हॅलेंटाऊन वीकमध्ये साजरा केला जातो.
7 फेब्रुवारी, रोझ डे (Rose Day) - या दिवशी प्रेमाच्या किंवा आयुष्यातील खास व्यक्तीला गुलाबपुष्प दिलं जातं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -