एक्स्प्लोर

2047 पर्यंत विकसित भारताचा आराखडा दर्शवणार अर्थसंकल्प :  अमित शाह

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी काल अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत.

Amit Shah : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी काल अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. 2047 पर्यंत विकसित भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा संकल्प साकारण्यासाठी आराखडा दर्शवणारा अर्थसंकल्प असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांनी व्यक्त केले. प्रत्येक क्षेत्रात भारत अग्रेसर व्हावा, यासाठी मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या महत्वाच्या कामगिरीवर अर्थसंकल्पात प्रकाश टाकण्यात आल्याचे शाह म्हणाले.  

हा अर्थसंकल्प पर्यटन क्षेत्राला नवी उर्जा देईल 

मोदी सरकारने सादर केलेल्या, शेतकऱ्यांसाठी समर्पित असलेल्या  विकसित भारत अर्थसंकल्पाने देशातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नव्या संधी आणल्या आहेत. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प पर्यटन क्षेत्राला नवी उर्जा देईल असेही अमित शाह म्हणाले. पर्यटनाला चालना देण्यासाठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी प्रोत्साहन आणि दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज राज्यांना देण्यात येणार आहे. यामुळं पर्यटन क्षेत्राची अर्थव्यवस्था बळकट होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असेही शाह  म्हणाले.

दरमहा 300 युनिट  वीज मोफत मिळणार 

लक्षद्वीप आणि इतर बेटासाठी हवाई दळणवळण सुरु करत  त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ‘सूर्योदय योजना’ पंतप्रधानांचा दृष्टीकोन प्रतिबिंबित करत असून एक कोटी कुटुंबांना त्यांच्या घराच्या छतावर सौर उर्जा प्रणाली बसवून त्याद्वारे वीज निर्मिती शक्य होणार आहे. त्यांना दरमहा 300 युनिट  वीज मोफत मिळणार असून, त्यामुळं त्यांची वर्षाला 15,000 ते 18,000 रुपयांची बचत होणार असल्याचे अमित शाह म्हणाले.   

आयुष्मान भारत योजनेद्वारे आतापर्यंत 30 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत उपचार

आयुष्मान भारत योजनेद्वारे पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 30 कोटीपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार पुरवले आहेत. आयुष्मान योजनेशी आशा सेविका, आंगणवाडी सेविका आणि सहाय्यक यांना जोडण्याचा महत्वाचा निर्णय आजच्या अर्थसंकल्पात घेण्यात आल्याने या वर्गालाही मोफत उपचाराचा लाभ घेता येईल. याशिवाय  गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी 9 ते 14 वयोगटातल्या मुलींच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्याचा महत्वाचा निर्णयही आजच्या अर्थसंकल्पात घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

PM किसानच्या निधीबाबत केवळ चर्चाच, अर्थसंकल्पात रकमेत वाढ करण्याचा निर्णय नाहीच 

महत्त्वाच्या बातम्या

पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Rates: अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?
अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget