एक्स्प्लोर

'या' डिफेन्स स्टॉकवर ठेवा नजर, अर्थसंकल्पानंतर देऊ शकतात दमदार रिटर्न्स!

येत्या 23 जुले रोजी आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

Defence Stock: येत्या 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याच कारणामुळे या अर्थसंकल्पात काय विशेष असणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचेही यावेळच्या अर्थसंकल्पावर लक्ष आहे. निर्मला सीतारामना कोणत्या क्षेत्रासाठी किती रुपयांची तरतूद करतात? कोणत्या क्षेत्रासाठी नेमके काय धोरण राबवले जाते? असे विचारले जात आहे. दरम्यान,  यावेळी केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील चांगले रिटर्न्स देणारे शेअर कोणते आहेत? अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कोण-कोणत्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे? यावर एक नजर टाकूया...

अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी तरतूद

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फ्रेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात त्यांनी संरक्षण क्षेत्रासाठी 6.21 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 4.3 टक्क्यांनी अधिक आहे. अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी तरतूद करण्यात आलेला निधी हा एकूण निधीच्या 13.04 टक्के होता. तज्ज्ञांच्या मते अंतरिम अर्थसंकल्पाचाच विस्तार यावेळच्या अर्थसंकल्पात केला जाईल.

डिफेन्स क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी 

जेव्हा-जेव्हा अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख जवळ येते तेव्हा-तेव्हा शेअर बाजारात मोठ्या हालचाली होतात. यावेळीदेखील गेल्या एका महिन्यात शेअर बाजारात साधारण 56 टक्क्यांची तेजी झाली आहे. संरक्षण क्षेत्रातील GRSE आणि मझगांव डॉक या दोन कंपन्यांच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी आली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या शेअरमध्ये क्रमश: 60 आणि 43 टक्क्यांनी तेजी मिळाली आहे. पारस डिफेन्स या शेअरमध्ये एका महिन्यात 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोचिन शिपयार्ड या कंपनीनेदेखील चांगले रिटर्न्स दिले आहेत. 

हे शेअर करू शकता खरेदी

इकनॉमिक्स टाईम्सच्या रिपोर्टनुसार ब्रोकरेज फर्म शेरखानने संरक्षण क्षेत्रातील काही स्टॉक्स गुंतवणुकीसाठी सुचवले आहेत. यामध्ये एचएएल, बीईएल, भारत फोर्ज या शेअर्सच नाव आहे. यासह एचएएल, बीईएमएल, बीईएल, एमडीएल, बीडीएल, जीआरएसई, डाटा पॅटर्न, कोचिन शिपयार्ड आदी कंपन्यांच्यांवरही लक्ष ठेवायला हवे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) 

हेही वाचा :

तारुण्यात पती वारला, दोनवेळच्या जेवणाची भ्रांत, संघर्षाचा डोंगर फोडून ठोंबरे काकूंनी लेकाला CA बनवलं!

सरकारची 'ही' महारत्न कंपनी देणार तगडे रिटर्न्स, गुंतवणूक केल्यास होणार जबरदस्त फायदा?

अर्थसंकल्पानंतर 'हे' आठ स्टॉक होणार रॉकेट? जाणून तगड्या शेअर्सची यादी!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
Ladaki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची नेमकी संख्या किती? आदिती तटकरेंनी आकडेवारी सांगितली, बीडच्या लाभार्थी संख्येवर स्पष्टीकरण
92 लाख अपात्र महिलांच्या संख्येवर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया, मूळ नोंदणी ते प्रत्यक्ष लाभार्थी संख्या सांगत म्हणाल्या
Gold- Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीचाही भाव घसरला; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीचाही भाव घसरला; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget