परभणी : लोकसभा निवडणुकीत प्रचाराला दिवसेंदिवस रंगत चढत आहे. येते महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) हे एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. हे दोन्ही नेते विजयासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करताना दिसतायत. दरम्यान,माझ्या प्रचाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येणार आहेत, अशी माहिती जानकर यांनी दिली आहे. 


20 एप्रिलला मोदी सभा घेणार


जानकर यांनी एका प्रचारसभेत बोलताना वरील माहिती दिली आहे. जनकर हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांनी माझ्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी 20 एप्रिल रोजी परभणीत सभा घेणार आहेत, असं सांगितलं आहे. मी परभणीत जातीपातीच्या नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला आलेलो आहे. इथले खासदार मिळालेला निधी खर्च करत नाहीत, ते संसदेतही जात नाहीत, असा खोचक टोला जानकर यांनी संजय जाधव यांना लागवलाय. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः माझ्या प्रचारासाठी येत्या 20 एप्रिल रोजी परभणीत येणार आहेत, अशी माहितीही जानकर यांनी दिली.  


माझ्यासोबत खाण आणि बाण


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या वतीने पाथरी तालुक्यात महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पदाधिकाऱ्यांच्या मेळावा आणि प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत त्यांनी संजय जाधव यांच्यावर टोकदार शब्दांत टीका केली. माझ्यासोबत आता खान पण आहे आणि बाण पण आहे. मी इथल्या प्रत्येक प्रश्नावर काम करणार आहे. मोदींच्या 20 एप्रिलच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आदी नेतेदेखील उपस्थित राहतील अशी माहितीही जानकर यांनी दिली आहे. 


बंडू तू लहान, माझ्या नादाला लागू नको


दरम्यान, याआधी जो मायबापाला 5-5 वर्ष भेटत नाही तो मतदारांना काय भेटणार? अशी जहरी टीका महाविकस आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी केली होती. त्यानंतर आता जानकर यांनीदेखील संजय जाधवांना चोख शब्दांत प्रत्युत्तर दिलंय. बंडू जाधव तू फार छोटा माणूस आहे.माझ्या नादी लागू नको, फार अवघड होईल, असं विधान जानकरांनी केलंय.शिवाय आपण हिंदकेसरीसोबत निवडणूक लढतोय कुणाच्या धमक्यांना घाबरू नका असं आवाहनही जानकर यांनी लोकांना केले.  


हेही वाचा :


माढ्यात पवारांना काटशह देण्यासाठी भाजपची नवी खेळी, मोहिते पाटलांच्या विरोधकाला गळाला लावणार?


मंडीमध्ये कंगनाला तगडं आव्हान, काँग्रेसनं माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उतरवलं लोकसभेच्या रिंगणात


भाजपमध्ये जाताच अशोक चव्हाण कामाला लागले, काँग्रेसच्याच उमेदवाराला गळाला लावण्याचा प्लॅन, फोनवरुन संभाषण