एक्स्प्लोर

Bitcoin चे गुंतवणूकदार मालामाल, एका Bitcoin ची किंमत 47 लाखांवर

Bitcoin च्या किंमतीचा नवा विक्रम नोंदवला गेला असून एका बिटकॉईनची किंमत 47 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे यात गुंतवणूक करणारे सध्या मालामाल झाल्याचं पहायला मिळतंय.

नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनने या आधीच्या किंमतीचे सर्व विक्रम मोडले आहेत. मंगळवारी एका बिटकॉईनची किंमत 62,575 डॉलर म्हणजे जवळपास 47 लाखांवर गेली आहे. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणारे मालामाल झाले आहेत. केवळ एकाच वर्षापूर्वी एका बिटकॉईनची किंमत साडेतीन लाखाच्या जवळपास होती. आता त्यात जवळपास 13 पट वाढ झाली आहे. 

कोरोनाच्या काळात जागतिक अर्थव्यवसस्थेत मंदी असताना बिटकॉईनची किंमत मात्र सातत्याने वाढत राहिली. या काळात जगातल्या अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी त्यामध्ये गुंतवणूक केली. टेस्लाच्या इलॉन मस्कनेही यामध्ये 1.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर बिटकॉईनच्या किंमतीत वेगाने वाढ झाल्याचं दिसून आलंय. तसेच बीएनवाय मेलन, मास्टरकार्ड या कंपन्यांनीही बिटकॉईनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

जगामध्ये अनेक देश बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करत असताना भारतात अजून त्याला परवानगी देण्यात आली नाही. सध्याचे कायदे हे क्रिप्टोकरन्सीच्या वापरासंबंधात अपूर्ण आहेत, त्यामधील संदिग्ध गोष्टींचा सामना करण्यास ते पुरेसे नाहीत. आरबीआय आणि सेबी यांसारख्या नियामक मंडळांकडे क्रिप्टोकरन्सीच्या वापराबाबत निश्चित असे नियम नाहीत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर थेट नियंत्रण ठेवता येत नाही. या संबंधी लवकरच या संबंधी केंद्र सरकार संसदेत विधेयक आणेल असं केंद्र सरकारच्या वतीनं संसदेत सागण्यात आलं आहे.

आरबीआयने बिटकॉइनसारख्या व्हर्च्युअल करन्सीच्या वापरावर 2018 साली बंदी घातली होती. ती बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली होती.

काय आहे बिटकॉइन?
बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंट व्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
Share Market : ICICI बँकेचा पहिल्या तिमाही नफा 16 टक्क्यांनी वाढला, नफा 14,805 कोटींवर पोहोचला
ICICI बँकेचा पहिल्या तिमाही नफा 16 टक्क्यांनी वाढला, नफा 14,805 कोटींवर पोहोचला
पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?
पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Amitabh Bachchan Shares Health Update: अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; स्वतः बिग बींनी दिली हेल्थ अपडेट, म्हणाले, 'रिकव्हरीचा काळ खूप कठीण...'
अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; ICU मध्ये केलेलं दाखल, बिग बींना नेमकं झालंय तरी काय?
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
Rahul Gandhi: एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
Ajit Pawar Birth Anniversary : दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
Embed widget