नवी दिल्ली : अमेरिकेतील पहिल्या बिटकॉईन इटीएफ च्या लिस्टिंग मुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बिटकॉईनच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी यामध्ये मोठी तेजी आली असून त्याची किंमत विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. आशियाई मार्केटमध्ये बिटकॉईनच्या किंमतीमध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली असून ती 64,895 डॉलर्सवर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यानंतर ती एका सर्वात उच्च स्तरावर आहे. 

बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमुळे आर्थिक संकट येण्याची शक्यता, बँक ऑफ इंग्लंडच्या डेप्युटी गव्हर्नरांनी व्यक्त केली भीती

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी जगभरातल्या लोकांसाठी हा महिना भलताच चांगला गेल्याचं दिसून येतंय. काही दिवसांपासून बिटकॉईनच्या किंमतींत वाढ होत आहे. इथेरियम आणि चेनलिंक या क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीतही 5 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून येतंय. गेल्याच आठवड्यात शिबा इनू काईनच्या किंमतीत तब्बल 47 टक्क्यांची वाढ झाल्याने या क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार करणारे मालामाल झाले आहेत. 

मंगळवारी बिटकॉईनच्या किंमती या 64 हजार डॉलर्सवर पोहोचल्या. प्रोशेअर बिटकॉईन स्ट्रॅटेजी ईटीएफ हे 2.59 टक्यांवर बंद झालं. त्यावेळी त्याची किंमत 41.94 डॉलर्स इतकी होती. मंगळवारी इंटरकन्टिनेन्टल एक्सचेंन्ज आयएनसी आयसीई एन अर्का एक्सचेन्जवर एक अब्ज डॉलर्सचे ट्रेडिंग करण्यात आलं. यामध्ये लहान गुंतवणूक दारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं दिसून येतंय. यामध्ये मोठ्या गुंतवणूकदारांनी अद्याप ट्रेडिंग सुरु केलं नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे ते यापासून सध्यातरी दूर राहत असल्याचं स्पष्ट झालं. 

दरम्यान, बिटकॉईननंतर दुसऱ्या क्रमांकावर लोकप्रिय असलेल्या इथेरियम या क्रिप्टोकरंन्सीची किंमत 0.39 टक्के वाढली. ती सध्या 3,861 डॉलर्सवर पोहोचली आहे. डॉजकॉईनच्या किंमतीही एक टक्क्यांनी वाढून ती 0.24 डॉलर्सवर पोहोचली आहे. 

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी जगभरातल्या लोकांसाठी हा महिना भलताच चांगला गेल्याचं दिसून येतंय. काही दिवसांपासून बिटकॉईनच्या किंमतींत वाढ होत आहे. इथेरियम आणि चेनलिंक या क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीतही 5 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून येतंय. गेल्याच आठवड्यात शिबा इनू काईनच्या किंमतीत तब्बल 47 टक्क्यांची वाढ झाल्याने या क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार करणारे मालामाल झाले आहेत.

काय आहे बिटकॉइन?

बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंटव्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.