Mumbai Cruise Drug Case : ड्रग्जचा धंदा, बिटकॉईनचा फंडा; ड्रग्ज खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCruise Drugs Case : शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ज्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी कोठडीची हवा खावी लागतेय. त्या प्रकरणाची व्यापी फक्त दिल्ली-मुंबईपुरती मर्यादीत नाही, तर याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहेत. क्रूझवर पार्टीसाठी जे ड्रग्ज आणण्यात आलं होतं, त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला होता. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीनं आर्यन खानसह एकूण 8 जणांना अटक केली आहे. यांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर, एनसीबीनं एका मोठ्या ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेतलंय. या तस्कराच्या चौकशीनंतर ड्रग्जसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर झाल्याची माहिती मिळाली आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण आता आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे. एनसीबीला संशय आहे की, क्रूझवर जे ड्रग्स आणण्यात आले होते. त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्टीचे आयोजक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
एनसीबीला माहिती मिळाली आहे की, एका प्रवाशांनं नशेत धुंद झाल्यानंतर क्रूझच्या खिडक्यांची तोडफोड केली होती, त्याला ताब्यात घेतलं होतं. एनसीबी सध्या चौकशी करत आहे की, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला इथे कोणी आमंत्रित केलं होतं? तसेच आर्यनच्या मित्रांकडे सापडलेल्या ड्रग्ससाठी कोणी पैसे दिले होते?