एक्स्प्लोर

Bitcoin मधील गुंतवणुकीचा नवा उच्चांक! बाजार भांडवल एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत

अॅलन मस्क यांची कंपनी टेस्लाच्या गुंतवणूकीनंतर बिटकॉइनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांनी यात गुंतवणूक केली आहे.

शुक्रवारी बिटकॉइनने एक ट्रिलियन डॉलर्सचे बाजार भांडवल साध्य केलं आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकर्न्सीने गेल्या आठवड्यात 54 हजार डॉलर्सचा आकडा पार केला. गेल्या एका आठवड्यात यात 11 टक्क्यांनी वाढ झाली तर या आठवड्यात आतापर्यंत 64 टक्क्यांनी वाढ झाली आहे. खरं तर, अॅलन मस्कने बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यानंतर, त्याचे मूल्य खूप वेगाने वाढले होते. यामध्ये टेस्ला, मास्टरकार्ड ते बीएनवाय मेलनपर्यंत अनेक मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. जगातील सर्व क्रिप्टोकरन्सीचे एकूण बाजार मूल्यांकन 1.7 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे.

मोठ्या कंपन्यांच्या गुंतवणूकीमुळे किंमत वाढली जगभरात जितके सोनं आहे, त्याचे बाजार मूल्य हे 9 ते 10 लाख कोटी डॉलर्स आहे. पण, विश्लेषकांचे म्हणणे आहे की बिटकॉइनची सध्याची किंमत त्याच्या मूळ किंमतीपेक्षा अधिक आहे. आता जगभरात बिटकॉइनची स्वीकृती वाढली आहे, म्हणूनच आता लोक या डिजिटल चलनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्याचबरोबर अॅपल आणि टेस्ला सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्याही बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करीत आहेत. गेल्या आठवड्यात, अॅलन मस्कची कंपनी टेस्लाने बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक केली. त्याचबरोबर मास-म्युच्युअल, अ‍ॅसेट मॅनेजर गॅलेक्सी डिजिटल होल्डिंग, पेमेंट कंपनी स्क्वेअर अशा बर्‍याच मोठ्या विमा कंपन्यांनी बिटकॉईनमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे त्याची किंमत उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.

बिटकॉइन म्हणजे काय

बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर, रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंट व्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.

जगामध्ये अनेक देश बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करत असताना भारतात अजून त्याला परवानगी देण्यात आली नाही. या संबंधी राज्यसभेत झालेल्या चर्चेमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितलं होतं की देशात सध्या क्रिप्टोकरन्सी संदर्भातले कायदे हे अपूर्ण आहेत. क्रिप्टोकरन्सी संदर्भात संसदेत लवकरच विधेयक आणणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बँकेत नोकरीची मोठी संधी! 11 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, पगार मिळणार 64 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
बँकेत नोकरीची मोठी संधी! 11 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, पगार मिळणार 64 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
Tamil Nadu : सरकारी रुग्णालयात जन्म घेणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी मिळणार, जोसेफ विजय सरकारनं 1 लाख 28 हजार अंगठ्यांची ऑर्डर दिली
जोसेफ विजय सरकारचा मोठा निर्णय, सरकारी रुग्णालयात जन्म झालेल्या बालकांना सोन्याची अंगठी देणार

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget