Garlic Price Hike: सध्या लसूण (Garlic) उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) सुगीचे दिवस आलेत. कारण लसणाच्या दरात मोठी वाढ (Garlic Price Hike) झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. मात्र, दुसरीकडं सर्वसामान्यांच्या खिशावर याचा ताण पडत आहे. देशातील बहुतांश बाजारपेठेत लसून 500 ते 600 रुपये प्रतिकिलो दरानं विकाला जातोय. दरम्यान, केवळ भारतातच नाही तर चीनसह तुर्कस्तानसह इतर देशांमध्येही लसणाच्या दरात वाढ झाली आहे.
दरम्यान, सध्या बाजारात लसणाची आवक कमी असल्यानं लसणाच्या दरात अचानक वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या ताटातून लसूण गायब झाला आहे. येत्या काही दिवसांत लसणाचे भाव कमी होतील अशी माहितीही काही व्यापाऱ्यांनी सांगितली आहे. देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वाशी एपीएमसीमध्ये लसणाचे दर हे 600 रुपयांच्या आसपास आहेत. देशातील बहुतांश भागात लसणाच्या दरात वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारात लसूण 600 रुपयांवर
देशातील राज्यांमधून लसणाची आवक होत नसल्यानं तो बाजारात महागड्या दरानं विकला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 मार्चपर्यंत बाजारात लसणाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सध्या काही ठिकाणी बाजारात लसूण 400 ते 500 रुपये किलो दराने विकला जात आहे. तर दुसरीकडं किरकोळ बाजारात त्याची 600 रुपये किलोपर्यंत विक्री होत आहे. यावर्षी लसूण उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं दरात वाढ होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
लसणाचे भाव कधी कमी होणार का?
खराब हवामानामुळ मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्यामुळं लसणाचे भाव वधारल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत बाजारात लसणाची आवक वाढेल, त्यामुळे भाव पडतील, अशी आशा आहे.
कांदा-बटाटा स्वस्त, लसूण मात्र महाग
दरम्यान, एकीकडं देशात कांदा-बटाटा यांसारख्या इतर भाज्यांचे भाव कमी झाले असले तरी भाजीपाल्यातील फोडणी मात्र महाग झाली आहे. होय, कोलकाता ते अहमदाबाद एक किलो लसणाचा भाव 450 ते 500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. देशात लसणाच्या दरात झालेली वाढ ही अवघ्या 15 दिवसात झाली आहे. या काळात 200 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या लसणाचा भाव 300 रुपयांवरुन 500 रुपयांपर्यंत आले आहेत. आठवडाभरापूर्वी 300 रुपये किलोनं विकला जाणारा लसूण आता 500 रुपयांवर गेला आहे. दरम्यान, कोलकाता येथे 15 दिवसांपूर्वी 200 ते 220 रुपये दराने विकला जाणारा लसूण आता 500 रुपयांना विकला जात असल्याची विक्रेत्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: