Congress Meeting : काँग्रेस आमदारांची (Congress MLA) विधानभवनात आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेसने आज विधीमंडळ पक्ष कार्यालयात आमदारांची बैठक बोलावली आहे. उमेदवारी अर्ज आणि पुढील नियोजनासाठी ही आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. आजच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सर्व आमदारांना बजावला व्हीप बजावण्यात आला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या चर्चेसाठी आणि काँग्रेस उमेदवारचे नामांकन पत्र भरण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.


काँग्रेसने बोलावली बैठक


बुधवारीही काँग्रेस आमदारांची विधानभवनात बैठक बोलावण्यात आली होती, मात्र काही आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते. काँग्रेसच्या एकूण आमदारांपैकी 25 आमदार फक्त उपस्थित होते, तर इतर आमदार गैरहजर होते. अशोक चव्हाण यांच्याबरोबर त्या भागातील इतर काही आमदार देखील काँग्रेस सोडणार, असं बोललं जात आहे. त्यामुळे आज सर्व आमदारांना व्हीप देऊन काँग्रेस बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत सर्व काँग्रेस आमदार उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


काँग्रेसला खिंडार


अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याबरोबर त्या भागातील इतर काही आमदार देखील काँग्रेस सोडणार, असं बोललं जात आहे. त्यामुळे आज सर्व आमदारांना व्हीप देऊन काँग्रेस बैठक बोलावली आहे. 


बैठकीला हजर असलेले काँग्रेसचे आमदार



  1. विकास ठाकरे, पश्चिम नागपूर

  2. बळवंत वानखेडे, दर्यापूर

  3. ऋतुराज पाटील, कोल्हापूर दक्षिण

  4. जयश्री जाधव, कोल्हापूर उत्तर

  5. विजय वडेट्टीवार, ब्रम्हपुरी

  6. विक्रम सावंत, जत 

  7. रवींद्र धंगेकर, कसबा

  8. विश्वजीत कदम , पलूस कडेगाव

  9. साहसराम कारोटे, आमगाव

  10. नाना पटोले, साकोली

  11. बाळासाहेब थोरात, संगमनेर

  12. सुरेश वरपुडकर, पाथरी

  13. राजू आवळे, हातकणंगले

  14. प्रतिभा धानोरकर, वरोरा

  15. अमित झनक, रिसोड

  16. धीरज देशमुख, लातूर ग्रामीण

  17. नितिन राऊत, उत्तर नागपूर

  18. पृथ्वीराज चव्हाण, कराड दक्षिण

  19. अमिन पटेल, मुंबादेवी

  20. प्रणिती शिंदे, सोलापूर शहर (मध्य)

  21. यशोमती ठाकूर, तिवसा

  22. हिरामण खोसकर, इगतपुरी

  23. राजेश एकडे, मलकापूर

  24. कैलाश गोरंट्याल, जालना

  25. वर्षा गायकवाड, धारावी

  26. पी.एन.पाटील, करवीर

  27. शिरीष नाईक, नवापूर

  28. राजू पारवे, उमरेड

  29. लहू कानडे, श्रीरामपूर

  30. संजय जगताप, पुरंदर

  31. नितिन राऊत, उत्तर नागपूर

  32. कुणाल रोहिदास पाटील,धुळे ग्रामिण

  33. जितेश अंतापूरकर, देगलूर


परिषद आमदार – सतेज पाटील, विधानपरिषद आमदार.


येणार नसल्याचं कळवलेले आमदार 



  1. मोहन हंबर्डे, नांदेड दक्षिण - घरी लग्नकार्य आहे.

  2. माधवराव जवळगावकर, हदगाव - व्यक्तीगत कारणामुळे येणार नाही

  3. अमित देशमुख, लातूर शहर - विलासराव देशमुखांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आहे

  4. सुलभा खोडके, अमरावती - लग्नकार्याच्या निमित्ताने अनुपस्थित

  5. के.सी.पाडवी, अक्कलकुवा - आज वडलांच्या वर्षश्राद्धामुळे जाणार नाहीत असं कळवलं होतं.

  6. संग्राम थोपटे, भोर - बैठकीच्या गैरहजर राहण्याचं कळवलं आहे.

  7. असलम शेख, मालाड पश्चिम - बुधवारी बैठकीला उपस्थित

  8. झीशान सिद्दीकी, वांद्रे पूर्व - बुधवारी बैठकीला उपस्थित


नॉट रिचेबल असलेले काँग्रेस आमदार



  1. रणजीत कांबळे, देवळी - नॉट रिचेबल

  2. शिरिष चौधरी, रावेर - नॉट रिचेबल


 


दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा अर्ज भरण्यात येणार आहे. त्या आधी होत असलेल्या बैठकीत अजय चौधरी, राजेश टोपे देखील बैठकीत सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे नेते चंद्रकांत हांडोरे हे महाविकास आघाडीकडून राज्यसभेचा अर्ज भरतील. त्याआधी होत असलेल्या काॅग्रेस बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे देखील सहभागी झाले आहेत.


 


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


NCP MLA Disqualification Case: कोणाचे आमदार अपात्र, दादांचे की थोरल्या पवारांचे? आज विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात निकाल