Pre Wedding Industry :  नुकताच उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचे प्री-वेडिंग झाले. अंबानी कुटुंबाने या फंक्शनवर सुमारे 1200 कोटी रुपये खर्च केले. परंतू, तुम्हाला माहित आहे का? की प्री-वेडिंगचा हा नवीन उद्योग 10 लाख कोटी रुपयांचा आहे. देशात दरवर्षी सुमारे 30 लाख लग्ने होतात. पण लग्नाआधीच प्री-वेडिंगच्या माध्यमातून मोठा व्यवसाय देशात उभा राहत आहे.


आयुष्यात लग्न  एकदाच होते, असा विचार करत लोक आजकाल लग्नावर मोठा खर्च करतायेत. हा दिवस  खास बनवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. त्यामुळे लग्नाची तयारी आणि उत्सव काही महिने आधीच सुरु होतात. यासोबतच देशातील मध्यमवर्गाच्या संपत्तीत वाढ झाल्यामुळे त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढली आहे. त्यामुळेच आता लोकांमध्ये लग्नसमारंभावर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यामुळं देशात प्री-वेडिंग सेलिब्रेशनचा व्यवसाय वाढत आहे.


पंतप्रधान मोदींना 'वेड इन इंडिया' का हवंय?


अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला देशातच लग्न करण्याचे आवाहन केले होते. यानंतर त्यांनी ‘वेड इन इंडिया’चा नाराही दिला आहे. अनंत अंबानी यांनाही जामनगरमध्ये लग्न प्री वेडिंग केले. खरं तर, लग्नाच्या बाबतीत, कपडे, शूज, सजावट, दागिने, तंबू किंवा मेजवानी, अन्न आणि अगदी कार उद्योगाची विक्री वाढते. बाकी प्रवास, हॉटेल आणि इतर अनेक उद्योगांना लग्नसोहळ्यांचा फायदा होतो. आता लोकांमध्ये डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंडही सुरू झाला असून, त्यामुळे देश-विदेशात लग्नाची अर्थव्यवस्था वाढली आहे.


2024 मध्ये विवाहसोहळ्यांचा एकूण व्यवसाय किती होणार?


दरम्यान, जर लोकांनी परदेशात जाऊन लग्न केले तर भारताची बरीच संपत्ती इतर देशांमध्ये जाईल. WedMedGood च्या अहवालानुसार, देशात लग्नाशी संबंधित व्यवसाय दरवर्षी 7 ते 8 टक्के दराने वाढत आहे. 2024 मध्ये विवाहसोहळ्यांचा एकूण व्यवसाय 50 ते 75 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यात प्री-वेडिंग सेलिब्रेशनचाही चांगला भाग आहे.


दिव्यांची रोषणाई, फुलांची आकर्षक सजावट, भव्य स्टेज आणि दिग्गज मंडळी यांमुळे अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगचा सोहळा हा दिमाखदार झाला. 1 ते 3 मार्च दरम्यान या गुजरातमधील जामनगरमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स, ‘मेटा’चे सीईओ मार्क झुकरबर्ग, ‘ब्लॅकरॉक’चे सीईओ लॅरी फिंक, ‘ब्लॅकस्टोन’चे संस्थापक स्टीफन श्वार्झमन, ‘मॉर्गन स्टॅन्ले’चे सीईओ टेड पिक, ‘बँक ऑफ अमेरिके’चे अध्यक्ष ब्रायन थॉमस मॉयनीहॅन, ‘डिस्ने’चे सीईओ बॉब एग्नर आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांक ट्रम्प ही मंडळी देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होती. 


महत्वाच्या बातम्या:


Anant-Radhika Pre-Wedding: जगात श्रीमंत असलेल्या अंबानींच्या घरी आहे 'हा' डॉन, राधिका - अनंतच्या प्री वेडिंगमधला हा व्हिडिओ पाहिलात का?