मुंबई : तुम्हाला तुमच्या मुलाचे भवितव्य सुरक्षित करायचे असेल तर चिता सोडून गुंतवणूक करण्यास सुरुवात करायला हवी. गुंतवुकीचे सूत्र वापरून तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्याचे नियोजन करू शकता. तुम्ही आता गुंतवलेले हेच पैसे नंतर मुलाच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी तसेच इतर महत्त्वाच्या कामांसाठी वापरता येऊ शकतात. विशेष म्हणजे तुमच्या मुलाला 21 व्या वर्षी तुम्ही थेट करोडपती करू शकता. हे कसे शक्य आहे? त्यासाठी नेमके काय करावे लागेल? हे सविस्तरपणे जाऊन घेऊ या...
21x10x12 फॉर्म्यूला काय आहे?
तुमच्या मुलाकडे त्याच्या वयाच्या 21 व्या वर्षी एक कोटी रुपये असावेत, असे वाटत असेल तर तुम्ही आतापासूनच गुंतवणुकीस सुरुवात करायला हवी. त्यासाठी तुम्ही 21x10x12 हा फॉर्म्यूला वापरायला हवा. तुम्ही एसआयपी करून हे लक्ष्य साध्य करू शकता. एआयपीएच्या माध्यमातून तुम्ही म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास वर नमूद केलेली रक्कम तुमच्याकडे असू शकते. 21x10x12 या फॉर्म्यूल्यातील 21 म्हणजे सलग एक वर्षे गुंतवणूक, या फॉर्म्यूल्यातील 10 चा अर्थ हा प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची गुंतवणूक असा आहे. तर 21x10x12 या फॉर्म्यूल्यातील 12 चा अर्थ हा तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर साधारण 12 टक्के रिटर्न्स असा होतो. म्युच्यूअल फंडात गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला साधारण 12 टक्के रिटर्न्स मिळतात, असे समजले जाते. म्युच्यूअल फंड हा शेअर बाजाराशी निगडीत असतो. त्यामुळे या परताव्यात काही फरकही पडू शकतो.
वर नमूद केल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी एक कोटी रुपये हवे असतील तर लवकरात लवकर तुम्ही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली पाहिजे. त्याच्या जन्मानंतर लगेच ही गुंतवणूक चालू केल्यास हे लक्ष्य गाठणे सहज शक्य आहे.
मुलगा कसा कोट्यधीश होणार? जाणून घ्या..
तुम्ही वर नमूद केलेला फॉर्म्यूला वापरला आणि सलग 21 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 10000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही 21 वर्षांत एकूण 25 लाख 20 हजार 000 रुपयांची गुंतवणूक करला. तुम्ही केलेल्या या गुंतवणुकीवर 21 वर्षांत 12 टक्के व्याजदराने 88 लाख 66 हजार 742 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच तुमचा मुलगा 21 वर्षांचा झाल्यावर तुम्हाला एकूण 1 कोटी 13 लाख 86 हजार 742 रुपये मिळतील. याच पैशातून त्याची भविष्यकालीन पैशांची गरज पूर्ण होईल.
10000 रुपयांची एसआयपी कशी करणार?
वर नमूद केलेला फॉर्म्यूला सर्वांनाच समजला असेल. पण महिन्याला 10 हजार रुपयांची एसआयपी कशी करावी? असा प्रश्न अनेकांना पडली असेल. आर्थिक नियोजनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या पगारातील कमीत कमी 20 टक्के रकमेची गुंतवणूक केली पाहिजे. एखाद्या व्यक्तीला 50 हजार रुपये पगार असेल तर या पगाराचा 20 टक्के भाग म्हणजेच 10 हजार रुपये गुंतवणूक करणे शक्य आहे. इतर खर्च कमी करून मुलांसाठी प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी शक्य होऊ शकते.
हेही वाचा :
सोनं महागलं, पण त्याचा दर कसा ठरवला जातो? त्यासाठी नेमके नियम काय आहेत? जाणून घ्या...