मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आयफोन 16 चे (iphone 16) लॉन्चिंग झाले आहे. या फोनची प्री-बुकिंग चालू झाले असून 20 सप्टेंबर रोजीपासून फोनच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. अॅपल कंपनीने आयफोन 16 मध्ये यावेळी भन्नाट नवे फिचर्स दिले आहेत. आयफोन 16 मुळे यावेळी टेक क्षेत्रात एका प्रकारे खळबळच उडाली आहे. दरम्यान, आयफोन 16 आल्यानंतर आता लगेच आयफोन 17 ची चर्चा चालू झाली. हा फोन आगामी काळात बाजारात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आयफोन 17 मध्ये नेमकं काय आहे? हे जाणून घेऊ या...
लवकरच येणार आयफोन 17
आयफोन 17 विषयीच्या MacRumors या वृत्तसंकेतस्थळाने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार आयफोन 17 च्या सिरीजमध्ये आयफोन 16 पेक्षाही अधिक प्रगत असे फिचर्स येणार आहेत. आयफोन 17 मध्ये अधिक प्रगत कॅमेरा असू शकतो. आयफोन 17 सिरीजमध्ये एकूण चार फोन असू शकतात. सध्या लॉन्च झालेल्या आयफोन 16 मध्ये फ्रन्ट कॅमेरा हा 14 मेगा पिक्सेलचा आहे. तर आगामी आयफोन 17 च्या सर्व फोनमध्ये 24 मेगा पिक्सेलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसे झाल्यास सेल्फीसाठी हा फोन अगदी योग्य असण्याची शक्यता आहे. ज्या लोकांना सेल्फी, फोटोग्राफीची आवड आहे, त्यांनी आयफोन 16 खरेदी करण्याऐवजी आयफोन 17 ची वाट पाहणे योग्य राहील, असे मत टेक विश्वातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
कॅमेरा असणार अॅडव्हान्स
MacRumors या संकेतस्थळावरील माहितीनुसार iPhone 17 Pro Max मध्ये 48 मेगा पिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा असू शकतो. या अपग्रेडेशनमुळे आयफोन 17 प्रो मॅक्स वापरणाऱ्यांना फोटो काढताना अधिक झुम करता येईल. ज्यामुळे फोटोची क्वॉलिटी वाढण्याची शक्यता आहे. आयफोन 17 प्रो मॅक्स मॉडेलमध्ये ही सुविधा दिली जाऊ शकते. मात्र आयफोन 17 प्रो मॉडेलमध्ये हे फिचर असलेल की नाही? याबाबत सध्यातरी अस्पष्टता आहे.
सुपरफास्ट परफॉर्मन्स, रॅमही वैढणार
MacRumors च्या वृत्तानुसार आयफोन 17 हा फोन याआधीच्या आयफोनपेक्षा अधिक जलद काम करणार असेल. या फोनचा रॅमही जास्त असेल. आयफोन 17 सिरीजमधील आयफोन 17 प्रो मॅक्स हा फोन 12 जीबी रॅमचा असू शकतो. आयफोन 16 प्रो मॅक्स या मॉडेलमध्ये सध्या फक्त 6 जीबी रॅम देण्यात आलेला आहे. थेट दुपटीने रॅम वाढल्यामुळे आयफोन 17 प्रो मॅक्स मॉडेलमध्ये मल्टिटास्किंग सोपे होऊ शकते. तसेच अॅपल इंटेलिजन्स फिचर्समध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
आयफोन 17 च्या डिझाईनमध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयफोन 17 सिरीजचे फोन अधिक आकर्षक असण्याची शक्यता आहे. आयफोन 17 हा अधिक स्लीमर असू शकतो.
दरम्यान, आयफोन 17 सिरीज नेमकी कशी असू शकते, हे अद्याप स्पष्ट नाही. सध्यातरी या फोनसंदर्भात फक्त चर्चा केल्या जात आहेत. शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे आयफोन 17 सिरीज कशी असेल? त्यात काय फिचर्स असणार हे प्रत्यक्ष पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे.
हेही वाचा :