Benefits of Small Saving Schemes : सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक छोट्या बचत योजना (Small Saving Schemes) चालवल्या जातात. फक्त मोठ्या नाही तर, लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यासह चांगला फायदा होतो. छोट्या बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना यासारख्या काही योजनांचा समावेश होतो. या योजना सर्वसामान्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे लहान बचत योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.


बँक एफडीपेक्षा जास्त व्याज


लहान बचत योजनांची खास गोष्ट म्हणजे जास्त व्याज आणि सुरक्षित परतावा. बँकांच्या सामान्य बचत खात्यांच्या तुलनेत लहान बचत योजना जास्त व्याजदर देतात. अनेक वेळा, लहान बचत योजनांवरील व्याज बँक एफडीपेक्षाही जास्त असते. सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना या दोन लहान बचत योजना आहेत, ज्या जास्त व्याजदर देतात. या योजना प्रत्येकी 8 टक्क्यांपेक्षा जास्त दराने व्याज देत आहेत. हे अनेक बँकाच्या एफडीवरील व्याजदरापेक्षा जास्त आहे.


गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय


या सर्व बचत योजना सरकारी असल्याने यामध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला सुरक्षेची हमी मिळते. या योजनांमधील पैसे सुरक्षित राहतात आणि परताव्याची हमी असते. यामुळे या योजना अधिक लोकप्रिय आहेत. या योजना कमी जोखीम पसंत करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम गुंतवणूक आणि बचत पर्याय आहेत. छोट्या बचत योजनांच्या इतर फायदे जाणून घ्या.


लहान बचत योजनांचे 5 मोठे फायदे



  • छोट्या बचत योजना स्थिर परतावा देतात. तुम्ही या योजनांकडे उत्पन्नाचा विश्वासू स्रोत म्हणू पाहू शकता.

  • लहान बचत योजना सरकारी असल्याने, गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा मिळतो.

  • या योजनांमध्ये अगदी कमी प्रमाणात गुंतवणूक करू शकता आणि चांगला परतावा मिळवू शकता.

  • लहान बचत योजनांमध्ये कर लाभ देखील मिळतात. या योजनांमधून तुम्हाला कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळू शकते.

  • लहान बचत योजनांमध्ये अनेक पर्याय असतात. तुम्ही तुमच्यासाठी योग्य योजना निवडू शकता. घर किंवा कार खरेदी करणे किंवा मुलांचे शिक्षण किंवा सेवानिवृत्ती यासारखे दीर्घकालीन उद्दिष्टे, यासारख्या सर्व प्रकारच्या उद्देशासाठी लहान बचत योजनांमध्ये पर्याय उपलब्ध आहेत.



 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sukanya Samriddhi Yojana योजनेमध्ये गुंतवणूक कशी करावी? कधी आणि कसे मिळणार पैसे?