Bank Employees: सरकारी बँक कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते. इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 ते 20 टक्के वाढ करण्याचा प्रस्काव ठेवला आहे. तसेच याचबरोबर पाच दिवसांचा आठवडा देखील करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक युनियन यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही बाबींवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.


फायनान्शिअल एक्स्प्रेसशी बोलताना IBA ने सांगितले की, पगारवाढीबाबत 15 टक्क्यांवरून चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा स्थितीत 15 ते 20 टक्के पगारवाढीचा लाभ बैठकीत मिळू शकतो. जो गेल्या अनेक वर्षांतील सर्वोत्तम आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs) आणि IBA यांच्यातील विद्यमान वेतन करार 1 नोव्हेंबर 2022 रोजी कालबाह्य झाला आहे. तेव्हापासून बँक युनियन आणि आयबीए यांच्यात पगारवाढीबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. पाच दिवसांचे काम आणि पगारवाढीच्या करारावर बोलणी झाली, तर प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही हे नियम लागू होतील.


आठवड्यातून पाच दिवस काम होणार?


आठवड्यातून पाच दिवस काम करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.
पाच दिवस कामकाजाचा नियम लागू करण्याची बँक युनियन्सची अनेक दिवसांपासून मागणी आहे. सध्या बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी आहे. जर 5 दिवस काम करण्याची मागणी मान्य झाली, तर अशा स्थितीत आठवड्यातील उर्वरित पाच दिवस बँकेच्या कामकाजाचा कालावधी 30 ते 45 मिनिटांनी वाढेल. डिसेंबरच्या मध्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.


सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भेटवस्तू दिली जाऊ शकते


पुढील वर्षी देशात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. अशा परिस्थितीत अर्थ मंत्रालय देशभरातील लाखो बँक कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह आठवड्यातून दोन दिवस सुट्टी देऊ शकते. आयबीए आणि बँक युनियन यांच्यात झालेल्या करारानंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर नवीन नियम लागू केले जातील.


महत्त्वाच्या बातम्या:


पैशासाठी कोणाकडे हात पसरु नका, खात्यात झिरो बॅलन्स असतानाही बँक देते 10000 रुपये; जाणून घ्या प्रक्रिया