Bank Holidays in September 2023 : ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच सप्टेंबर महिना सुरु होण्यापूर्वी बँक (Bank Holiday) एकूण किती दिवस बंद राहणार आहेत, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कारण बँक हा सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. खात्यातून पैसे काढण्यापासून ते पैसे जमा करणे, जुन्या नोटा बदलणे इत्यादी कामासाठी आपल्याला बँकेत जावे लागते. जर तुम्हालाही सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर या महिन्याची बँकेची सुट्ट्यांची यादी नक्की पाहा.


ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. अशा परिस्थितीत ही यादी तपासून तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामांची यादी सहज बनवू शकता. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या यादीनुसार, सप्टेंबर 2023 महिन्यात एकूण 16 दिवस बँका बंद राहतील. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार सप्टेंबर महिन्यात एकूण 16 दिवस बँकांची सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.


सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in September 2023) : 


3 सप्टेंबर 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


6 सप्टेंबर 2023 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बँकेला सुट्टी (भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पाटणा)


7 सप्टेंबर 2023 : जन्माष्टमी (श्रावण Vd-8) / श्री कृष्ण अष्टमी (देशातील बहुतेक ठिकाणी सुट्टी)


9 सप्टेंबर 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार 


10 सप्टेंबर 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


17 सप्टेंबर 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


18 सप्टेंबर 2023 : वर्षसिद्धी विनायक व्रत/विनायक चतुर्थी (बंगळुरु, हैदराबाद)


19 सप्टेंबर 2023 : गणेश चतुर्थी (अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी)


20 सप्टेंबर 2023 : गणेश चतुर्थी (दुसरा दिवस), भुवनेश्वर, पणजी 


22 सप्टेंबर 2023 : श्री नारायण गुरु समाधी दिन (कोची, तिरूवनंतपुरम)


23 सप्टेंबर 2023 : बँक सुट्टी - महाराजा हरिसिंह जी यांचा जन्मदिन आणि चौथा शनिवार सुट्टी


24 सप्टेंबर 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


25 सप्टेंबर 2023 : श्रीमंत शंकरदेव यांची जयंती (गुवाहाटी)


27 सप्टेंबर 2023 : मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस) (जम्मू, कोची)


28 सप्टेंबर 2023 : ईद-ए-मिलाद / ईद-ए-मिलादुन्नबी - (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस) (बारा वफत)


29 सप्टेंबर 2023 : ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतर इंद्रजात्रा/शुक्रवार (गंगटोक, जम्मू, श्रीनगर)


बँक बंद असताना काम कसे हाताळायचे?


आजच्या काळात नवीन तंत्रज्ञानामुळे बँक बंद असतानाही ग्राहक बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. यासाठी तो नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा यूपीआय या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. त्याच वेळी, तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम वापरू शकता.


महत्त्वाच्या बातम्या : 


Petrol and Diesel Price: आज 506 वा दिवस, देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; तुमच्या शहरांतील किमती काय?