National Film Awards 2023:  चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या  69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची (69 National Film Awards) घोषणा काल (24 ऑगस्ट) झाली आहे. अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) आणि आलिया भट्ट  (Alia Bhatt) यांना  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. नुकतीच कृतीनं खास पोस्ट शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे.


कृतीची पोस्ट


कृतीनं पोस्टमध्ये लिहिलं, "ज्यांनी माझा या पुरस्कारासाठी विचार केला त्या ज्युरींचे आभार! हे माझ्यासाठी संपूर्ण जगासारखं आहे. दिनू, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. माझ्या पाठीशी सदैव उभे राहण्यासाठी आणि मला चित्रपट दिल्यासाठी."


पुढे तिनं पोस्टमध्ये लिहिलं, "लक्ष्मण सर.. तुम्ही मला नेहमी म्हणता “मिमी, देखना आपको फिल्म के लिए राष्ट्रीय पुरस्कार मिलेगा मिल गया सर!" मी तुझ्याशिवाय हे करू शकलो नसतो. आई, बाबा, नॅप्स.. तुम्ही लोक माझी लाईफलाइन आहात! धन्यवाद. माझ्यासाठी नेहमी  चेअर लिडर होण्यासाठी धन्यवाद' अभिनंदन आलिया.  मी खूप उत्साहित आहे की मी हा मोठा क्षण तुझ्यासोबत शेअर करत आहे." कृतीच्या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 






कृतीसोबतच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला देखील (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहते या दोघींना शुभेच्छा देत आहेत.


कृतीचे चित्रपट


कृतीला  'मिमी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मिमी हा चित्रपट 2021 रोजी रिलीज झाला. कृतीनं या चित्रपटात मिमी राठोड ही भूमिका साकारली. या चित्रपटासाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरनं देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. कृतीचा 'आदिपुरुष'  हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला.  आता कृतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


National Film Awards 2023: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'एकदा काय झालं' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर आलिया भट्ट आणि कृती सेनन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; पाहा विजेत्यांची यादी