Bank Holidays in May 2023 : एप्रिल महिना संपून आता मे महिना सुरु होईल. अशातच वर्षाचा पाचवा महिना सुरु होण्यापूर्वी (Bank Holidays in May 2023) बँक एकूण किती दिवस बंद राहणार आहेत, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग (Internet Banking), मोबाईल बँकिंगमुळे (Mobile Banking)  लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास (Cash Withdrawal), डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) इत्यादी कामांसाठी बँकेची गरज भासते. जर तुम्हाला बँकेतील काही महत्त्वाचं काम मे महिन्यात पूर्ण करायचं असेल तर या संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणं गरजेचं आहे.

  


मे महिन्यात 12 दिवस बॅंका बंद (May Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार मे महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.  


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार मे महिन्यात एकूण 12 दिवस बँकांची सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.


सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in May 2023) :


1 मे 2023 : महाराष्ट्र दिन. कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, बंगाल, गोवा आणि बिहारमध्ये बँका बंद राहतील. 


5 मे 2023 : बुद्ध पौर्णिमा. त्रिपुरा, मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, चंदीगड, उत्तराखंड, जम्मू, उत्तर प्रदेश, बंगाल, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील. 


7 मे 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


9 मे 2023 : रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिनानिमित्त बंगालमध्ये बँका बंद राहतील. 


13 मे 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार


14 मे 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


16 मे 2023 : राज्य दिन- सिक्कीम


21 मे 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


22 मे 2023 : महाराणा प्रताप जयंती. हिमाचल प्रदेश, शिमला येथे बँका बंद राहतील.


24 मे 2023 : त्रिपुरामध्ये काझी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त बँका बंद राहतील. 


27 मे 2023 : महिन्याचा चौथा शनिवार


28 मे 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरु शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करु शकता. लाँग वीकेंडसाठी, तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करु शकता.


महत्त्वाच्या बातम्या :


Important Days in April 2023 : 'एप्रिल फूल डे', 'अक्षय्य तृतीया', 'रमजान ईद'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी