Washington Sundar Ruled Out IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये (Indian Premier League) सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला मोठा झटका बसला आहे. वॉशिंग्टन सुंदर आयपीएल 2023 मधून बाहेर गेला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सनरायझर्स हैदराबादचा वॉशिंग्टन सुंदर या वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL 2023) बाहेर पडला आहे. संघाने गुरुवारी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाने ट्विटरवर याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे की, 'वॉशिंग्टन सुंदर हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. लवकर बर हो, वाशी.' या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे.


Washington Sundar IPL : हैदराबाद संघाला मोठा झटका! 


हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने सांगितलं आहे की, दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर यंदाच्या आयपीएल (IPL 2023) मोसमातील पुढील सामने खेळू शकणार नाही. दरम्यान, वॉशिंग्टन सुंदर आयपीएलच्या 16 व्या हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये प्रभावी ठरला नव्हता. सुंदरने आयपीएल 16 मध्ये खेळल्या गेलेल्या 7 सामन्यांच्या पाच डावांमध्ये 15 च्या सरासरीने आणि 100 च्या स्ट्राइक रेटने (Strike Rate) फक्त 60 धावा केल्या. सुंदरची सर्वाधिक धावसंख्या ही नाबाद 24 धावांची होती.


Washington Sundar IPL : वॉशिंग्टन सुंदर आयपीएल 2023 मधून बाहेर






सनरायझर्स हैदराबाद संघाच्या अडचणीत वाढ


गेल्या पाच सामन्यांमध्ये हैदराबाद संघाला फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर असलेल सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सुंदर संपूर्ण सीझनसाठी बाहेर जाणं हा मोठा धक्का आहे. हैदराबाद संघाकडे सध्या चार गुण आहेत. शनिवारी हैदराबाद संघाचा सामना दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाशी होणार आहे.


What is Hamstring Injury : हॅमस्ट्रिंगची दुखापत म्हणजे काय?


हॅमस्ट्रिंगची दुखापत (Hamstring Injury) म्हणजे मांडीच्या मागच्या बाजूला असलेल्या मोठ्या स्नायूंवर ताण येणे किंवा स्नायू फाटणे. खेळाडूंमध्ये ही एक सामान्य प्रकारची दुखापत आहे. याची तीव्रता वेगवेगळी असू शकते. हॅमस्ट्रिंगच्या (Hamstring) दुखापतीमध्ये स्नायूंवर सौम्य ताण किंवा स्नायू फाटणे, अशा समम्या उद्भवतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : आयपीएलमध्ये 5 हरवलेल्या स्टार खेळाडूंना मिळाली लाइफलाइन; रहाणेचा स्ट्राइक रेट 200 च्या वर, मोहित शर्माचाही दमदार कमबॅक