PS Small Saving Scheme Online Process : पोस्ट ऑफिस (Post Office) योजना (Schemes) हमी आणि परताव्यासाठी उत्तम गुंतवणूक योजना आहेत. पोस्ट ऑफिसने नुकतीच मासिक उत्पन्न योजना (MIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) खाती ऑनलाइन उघडण्याची सुविधा सुरू केली आहे. अधिकाधिक ग्राहकांना सुविधा देणे हा त्यामागचा उद्देश आहे.


पोस्ट ऑफिस योजनेत ऑनलाइन गुंतवणूक सुविधा


पोस्ट ऑफिसने MIS, SCSS आणि MSSC मध्ये ऑनलाइन गुंतवणूक सुविधा सुरू केली आहे. काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहजपणे ऑनलाइन गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसकडून अधिसूचना जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या अधिसुचनेमध्ये असे म्हटले आहे की MIS, SCSS आणि MSSC खाती ऑनलाइन उघडण्याची सुविधा पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या इंटरनेट बँकिंग विभागाच्या 'सामान्य सेवा' टॅबमध्ये उपलब्ध असेल. संकेतस्थळ.


MIS, SCSS आणि MSSC खाते ऑनलाइन कसं उघडावं?



  • यासाठी सर्वात आधी तुम्हाला 'जनरल सर्व्हिसेस टॅब' वर क्लिक करावं लागेल.

  • यानंतर 'सर्व्हिस रिक्वेस्ट' वर क्लिक करा.

  • येथे 'नवीन विनंती' (New Request) निवडा आणि पुढे जाण्यासाठी ओके वर क्लिक करा.

  • त्यानंतर तुम्हाला MIS, SCSS आणि MSSC खाते उघडण्यासाठी तीन पर्याय दिसतील. यापैकी तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडा.

  • येथे तुम्हाला ठेव रक्कम प्रविष्ट करावी लागेल.

  • यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिसचे डेबिट खातं निवडावं लागेल.

  • आता व्यवहाराची माहिती भरावी लागेल.

  • यानंतर, अटी आणि शर्तींना सहमती देण्याच्या पर्यायावर क्लिक करा.

  • आता 'Submit Online' वर क्लिक करा.

  • यानंतर ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाका आणि सबमिट वर क्लिक करा.

  • आता तुम्ही ठेव पावती देखील डाउनलोड करू शकता.


'या' गोष्टींची काळजी घ्या



  • या नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिसची इंटरनेट बँकिंग सुविधा असणे आवश्यक आहे.

  • SCSS मध्ये फक्त 60 वर्षांवरील लोकच ऑनलाइन गुंतवणूक करू शकतात. या खालच्या पात्र लोकांना पोस्ट ऑफिसच्या शाखेत जावे लागेल.

  • या योजनांमध्ये, ऑनलाइन खाते फक्त इंटरनेट बँकिंग वापरकर्त्याच्या आणि त्याच्या नॉमिनीच्या नावाने उघडलं जाऊ शकते.


लवकरच 'या' योजना ऑनलाइन बंद करता येणार


मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच या योजना ऑनलाइन बंद करण्याची सुविधाही सुरु करण्यात येईल. एमआयएस, एससीएसएस आणि एमएसएससी ऑनलाइन बंद करण्याची सुविधा पोस्ट ऑफिसकडून लवकरच सुरू केली जाणार आहे.