Maharashtra News: नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. बाबा मस्की, शोभा मस्की दाम्पत्याकडून जीवे मारण्याची धमकी आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच, दाम्पत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमकीचा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. राजुरा शहरात राहणाऱ्या आणि विविध आंदोलनात सतत सहभागी होणाऱ्या बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्यानं सोशल मीडियावर शिवीगाळ करत जीवे मारण्याचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.                    


दरम्यान, पोलिसांनी या दांपत्यावर सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. गडचांदूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई चालवली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. वेगळा विदर्भ, अतिक्रमित शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे, वन्यजीवाद्वारे पिकांचे होणारे नुकसान यासंदर्भात भाष्य करताना देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कॅमेऱ्यावर अधिक बोलण्यास नकार दिला आहे.             


पाहा व्हिडीओ : Devendra Fadnavis - Sudhir Mungantiwar यांना मस्की दामप्त्याकडून जीवे मारण्याची धमकी, प्रकरण काय?



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आणखी एक झटका; मुलगी सूनेसह दोघांवर आरोपीचा ठपका, प्रकरण नेमकं काय?