Government Banks : सरकारी बँकांसांठी (Government Banks) एक दिलासादायक बातमी आहे. कारण खासगी बँकांपाठोपाठ आता सरकारी बँकांचीही स्थिती सुधारत असल्याचे चित्र समोर आलं आहे. आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांनी प्रचंड नफा कमावला आहे. सरकारी 3 बँकांनी फक्त  3 महिन्यांत 6498 कोटी रुपये कमावले आहेत. 


इंडियन बँकेच्या नफ्यात  52 टक्क्यांची वाढ


मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यात सरकारी बँकांना मोठ्या प्रमाणात नफा मिळवला आहे.  आकडेवारीबद्दल बोलायचे तर देशातील तीन सरकारी बँकांना एका तिमाहीत 6,498 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. यामध्ये  सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने प्रथम क्रमांक मिळवला आहे. आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर, 2023) या बँकेचा नफा 52 टक्क्यांनी वाढून 2,119 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेने आज याबाबतची माहिती दिली. बँकेने याबाबत म्हटले आहे की, मुख्य उत्पन्नात सुधारणा आणि बुडीत कर्जे कमी झाल्यामुळं त्याचा नफा वाढला आहे. इंडियन बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, या तिमाहीत त्यांचा ऑपरेटिंग नफा 4097 कोटी रुपयांवर जवळपास स्थिर राहिला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 4,061 कोटी रुपये होता. या काळात इंडियन बँकेचे उत्पन्नही वाढले आहे. या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 16,099 कोटी रुपये झाले आहे. जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 13,551 कोटी होते. त्याचवेळी, डिसेंबर 2023 तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वाढून 14,198 कोटी रुपये झाले, जे डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 11,834 कोटी रुपये होते.


इंडियन ओव्हरसीज बँकेच्या नफ्यात 30 टक्क्यांची वाढ


इंडियन बँकेव्यतिरिक्त सरकारी क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) चा चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर, 2023) निव्वळ नफा 30 टक्के वाढला आहे. या बँकेचा निव्वळ नफा 723 कोटी रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत चेन्नई बँकेचा निव्वळ नफा 555 कोटी रुपये होता. 
कॅनरा बँकेने 3,656 कोटी रुपये कमावले.


कॅनरा बँकेचा चालू तिमाहीत 29 टक्के नफा


सरकारी बँकांच्या यादीत समाविष्ट असलेल्या कॅनरा बँकेनं या कालावधीत 29 टक्के विक्रमी नफा नोंदवला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर, 2023) तो 29 टक्क्यांनी वाढून 3656 कोटींवर पोहोचला आहे. बँकेने आज याबाबतची माहिती दिली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 2,832 कोटी रुपये होता.


या तीन बँकांची स्थिती पाहता सरकारच्या प्रयत्नांचा बँकिंग क्षेत्रावर चांगला परिणाम दिसू लागला आहे. खासगी बँकांपाठोपाठ आता सरकारी बँकांचीही स्थिती सुधारत आहे. आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांनी प्रचंड नफा कमावला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


'या' 8 बँकांमध्ये FD करा, भरघोस नफा मिळवा, सविस्तर माहिती एका क्लिकवर