Bank FD Rate News: अनेकजण गुंतवणुकीचे (investment) सुरक्षीत मार्ग शोधत असतात. गुंतवणूक करताना प्रत्येकजण दोन गोष्टी पाहतो. एक म्हणजे आपली ठेव सुरक्षीत राहावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठेवीवर चांगला परतावा मिळावा. यासाठी अनेकजण बँकांमध्ये FD करण्याचा मार्ग निवडतात. काही बँकांमध्ये FD केल्यास चांगला परतावा मिळतो. आज आपण अशा आठ बँकांची माहिती पाहणार आहोत, ज्या बँकांमध्ये 8 टक्क्यांच्या आसपास परतावा मिळतो. 


DCB बँक


DCB ही बँक सध्या FD वर 8 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. हे व्याज 2 वर्षांपेक्षा जास्त परंतू, 3 वर्षांपेक्षा कमी 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी आहे.


RBL बँक


RBL बँक 1 ते 2 वर्षे आणि 2 ते 3 वर्षांसाठी 1 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर 8 टक्के व्याज देत आहे. त्यामुळं या बँकेत FD करुन चांगला परतावा मिळू शकतो. 


IDFC Bank


IDFC ही बँक FD वर 4.50 टक्के ते 7.75 टक्के व्याज देत आहे. 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी सर्वाधिक 7.75 टक्के व्याज 1 ते 2 वर्षे आणि 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी आहे.


इंडसइंड बँक 


इंडसइंड बँक 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर 7.50 टक्के व्याज देत आहे. 1 ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी दर 7.50 टक्के आणि 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी 7.25 ते 7.50 टक्के आहे.


येस बँक


येस बँक 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर सर्वाधिक 7.75 टक्के व्याज देत आहे, जे 1 वर्ष ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी आहे.


बँक ऑफ बडोदा 


बँक ऑफ बडोदा 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे.


HDFC बँक


MCAP च्या दृष्टीने देशातील सर्वात मोठी बँक 1 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर 7.15 टक्के व्याज देत आहे.


अॅक्सिस बँक


अॅक्सिस बँक 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर 7.10 टक्के व्याज देत आहे.


तुम्ही FD वर देखील कर्ज घेऊ शकता का?


एफडी तोडण्यापेक्षा तुमच्या एफडीवर कर्ज घेणे चांगले. अनेक बँका ही सुविधा देत आहेत. जे तुम्हाला पर्सनल लोनपेक्षा स्वस्त पडेल. परंतू कर्ज घेतल्यावर एफडीवरील व्याजापेक्षा एक किंवा दोन टक्के जास्त व्याज द्यावे लागेल. या पर्यायात तुमचा कर्जाचा बोजा वाढला असला तरी एफडीमध्येही मोठी बचत होईल. त्यामुळं हा पर्याय अधिक चांगला मानला जाऊ शकतो. समजा एखाद्या व्यक्तीने त्याची पाच वर्षांची एफडी मुदतीपूर्वीच तोडली.  तर ज्यावर वार्षिक 7 टक्के व्याज दिले जात आहे. अशा परिस्थितीत, मुदतीपूर्वी एफडी तोडल्याबद्दल तुम्हाला दंड भरावा लागेल. अनेक बँका यासाठी शुल्क आकारतात. अशा परिस्थितीत हा पर्याय तुमच्यासाठी तोट्याचा ठरू शकतो.


महत्त्वाच्या बातम्या:


FD तोडावी की कर्ज घ्यावं? अचानक पैशांची गरज भासली तर कोणता निर्णय फायदेशीर ठरेल?