Bank FD News : मागील काही दिवसापूर्वीच देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने त्यांच्या FD व्याजदरात वाढ केली आहे. मुदत ठेवींच्या बाबतीत, प्रत्येक गुंतवणूकदाराने सर्वच बँकांच्या व्याजदरांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण, ज्या बँकेत सर्वाधिक परतावा मिळत असेल, त्याच बँकेत गुंतवणूक करावी. आज आम्ही तुम्हाला 6 बँकांच्या FD व्याजदरांची माहिती सांगणार आहोत. जाणून घेऊयात कोणती बँक किती व्याजदर देते याबद्दलची माहिती.
अलीकडे RBI ने आपल्या धोरण व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे मुदत ठेवी पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. अलीकडेच, देशातील सर्वात मोठी खासगी HDFC बँकेने त्यांच्या FD व्याजदरात वाढ केली आहे.
एक वर्षाच्या FD वर कोणती बँक किती परतावा देते?
HDFC बँक
HDFC बँक ही नियमित ग्राहकांना 6.60 टक्के परतावा आणि एका वर्षाच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 7.10 टक्के परतावा देत आहे. 15 ते 18 महिन्यांच्या FD वर 7.10 टक्के व्याजदर आहे. 18 ते 21 महिन्यांच्या FD वर बँक 7.25 टक्के व्याज देत आहे. बँक 21 महिने ते 2 वर्षे आणि 11 महिन्यांच्या FD वर 7 टक्के व्याज देत आहे. 2 वर्षे 11 महिने ते 35 महिन्यांच्या FD वर 7.15 टक्के व्याजदर आहे. नवे दर 9 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.
ICICI बँक
ICICI बँक एका वर्षाच्या FD वर 7.40 टक्के व्याज देते. 390 दिवस ते 15 महिन्यांच्या FD वर हा परतावा 7.30 टक्के आहे. 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर वार्षिक परतावा 7.05 टक्के आहे. बँक 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 7 टक्के व्याज देते. नवीन दर 8 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. SBI एका वर्षाच्या FD वर 6.80 टक्के परतावा देत आहे. 2 ते 3 वर्षांच्या FD वर परतावा 7 टक्के आणि 3 ते 5 वर्षांच्या FD वर परतावा 6.75 टक्के आहे. 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर परतावा 6.5 टक्के आहे. नवीन दर 27 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहेत.
ॲक्सिस बँक
ॲक्सिस बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एका वर्षाच्या एफडीवर 6.7 टक्के परतावा देत आहे. 2 वर्षांच्या एफडीवर परतावा 7.10 टक्के आहे. 3 वर्षांच्या एफडीवर 7.10 टक्के आणि 5 वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज मिळेल. हे दर 5 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक एका वर्षाच्या एफडीवर 7.10 टक्के व्याज देते. 2 वर्षांच्या FD वर परतावा 7.15 टक्के आहे.3 किंवा 4 वर्षांच्या FD वर परतावा 7 टक्के आहे. 5 वर्षांच्या FD वर परतावा 6.20 टक्के आहे.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा ही 1 ते 2 वर्षांच्या FD वर 6.85 टक्के परतावा देत आहे. 2 ते 3 वर्षांच्या FD वर परतावा 7.25 टक्के आहे. बँक 4 वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्के व्याज देत आहे.
महत्वाच्या बातम्या: