Business News : आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पापूर्वी दिल्लीचे अर्थमंत्री आतिशी (Minister Atishi) यांनी शुक्रवारी दिल्लीचा आर्थिक आढावा सादर केला. यामध्ये त्यांनी विविध प्रकारची माहिती दिलीय. दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीचे सरासरी उत्पन्न 4.61 लाख रुपये झाले आहे. मागील 2 वर्षात यामध्ये मोठी सुधारणा झाली असल्याचे अर्थमंत्री आतिशी म्हणाल्या.


दिल्लीच्या GDP मध्ये झाली वाढ 


दिल्लीचा अर्थसंकल्प 4 मार्चला सादर होणार आहे. त्याआधी, राज्याच्या आर्थिक आढाव्यात दोन वर्षांत दिल्लीचे दरडोई उत्पन्न 22 टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात ही सरासरी 3.76 लाख रुपये होती. दिल्लीचे अर्थमंत्री अतिशी यांनी 2023-24 या वर्षाचा आर्थिक आढावा विधानसभेत सादर केला. अनेक अडथळ्यांनंतरही देशाच्या राजधानीतील लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्याच्या किमतींनुसार दिल्लीचा राज्य GDP (GSDP) 2023-24 या आर्थिक वर्षात 11,07,746 कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. 2022-23 च्या तुलनेत हे 9.17 टक्के अधिक आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात दिल्लीचा GSDP 10.14 लाख कोटी रुपये होता. कोविडच्या संकटानंतरच्या काळात, दिल्लीचा वास्तविक GSDP 2021-22 मध्ये 8.76 टक्के आणि 2022-23 मध्ये 7.85 टक्के दराने वाढला आहे. देशाच्या इतर भागांपेक्षा हे वेगवान असल्याचे अर्थमंत्री आतिशी म्हणाल्या.


देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 1.5 टक्के लोक दिल्लीत राहतात


देशाच्या लोकसंख्येपैकी 1.5 टक्के लोक दिल्लीत राहतात. तर देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचा जीडीपीचा वाटा सुमारे 3.9 टक्के आहे. दिल्लीत किरकोळ महागाई दर खूपच कमी आहे. जानेवारी-डिसेंबर 2023 मध्ये दिल्लीचा महागाई दर 2.81 टक्के होता, तर याच कालावधीत देशाचा महागाई दर 5.65 टक्के होता. दिल्ली सरकार इथल्या लोकांना मोफत वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, महिलांसाठी मोफत बस तिकीट आणि वृद्धांसाठी तीर्थयात्रा सुविधा पुरवते, असे असूनही दिल्ली सरकारचे बजेट नफ्यातच राहिले आहे.


देशाच्या GDP  दरात मोठी वाढ


सरकारने चालू आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीचे GDP वाढी संदर्भातील आकडे जाहीर केले आहेत. निवडणुकीपूर्वी जीडीपीच्या दरात चांगली वाढ (Growth rate) झाल्याचे दिसून आले आहे. ही वाढ 8.4 टक्क्यांची आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत नोंदवलेल्या 4.3 टक्क्यांच्या वाढीच्या दरापेक्षा हा दर खूप जास्त आहे. हा विकासदर केवळ अर्थव्यवस्थेसाठी आणि सरकारसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. यामुळं जगासमोर भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत .


महत्वाच्या बातम्या:


दिलासादायक! तिसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर, GDP वाढीच्या दरात नेमकी वाढ किती?