Adani Ports & SEZ  Adani Share: भारतीय उद्योगजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासमोरील अडचणी संपण्याची चिन्ह नाहीत. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या (Adani Group) शेअर दरात घसरण झाली होती. त्यानंतर आता सेबीच्या चौकशीचा (SEBI) सामना करावा लागत आहे. अशातच अदानी समूहाला पुन्हा एकदा झटका लागला आहे. अदानी समूहातील महत्त्वाची कंपनी अदानी पोर्टस् अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (Adani Ports & Special Economic Zone) या कंपनीच्या व्यवहारावर लेखापरीक्षकाने प्रश्न निर्माण करण्यात आला आहे. 


ऑडिटरकडून प्रश्न चिन्ह


अदानी पोर्टस् अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (Adani Ports & Special Economic Zone) या कंपनीच्या ऑडिटरचे काही मुद्यांवर समाधान झाले नाही. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अदानी पोर्टस् अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोनने  (Adani Ports & Special Economic Zone) ऑडिटर कंपनी Deloitte Haskins & Sells LLP काही व्यवहारांची पूर्ण माहिती दिली नाही. 


व्यवहारावर शंका


ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, Deloitte Haskins & Sells LLP ने मंगळवारी अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन या तीन संस्थांसोबतच्या व्यवहारांवर चिंता व्यक्त केली. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे म्हणणे आहे की या तिन्ही संस्था असंबंधित पक्ष आहेत, म्हणजेच त्यांचा कंपनीशी कोणताही संबंध नाही. त्याच वेळी,  ऑडिटरनुसार, संबंधित कंपन्यांशी संबंध नाही, याची पुष्टी करू शकत नाही. लेखापरीक्षकाने असेही म्हटले की स्वतंत्र बाह्य तपासणी केल्याने याची पुष्टी करण्यात मदत झाली असती, परंतु अदानी पोर्ट्सने त्यास नकार दिला. 


Deloitte Haskins & Sells LLP ने म्हटले की, त्याच्या मूल्यांकनात ऑडिट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुरेशी माहिती नव्हती. अशा परिस्थितीत, कंपनी अर्थात अदानी पोर्ट्स स्थानिक कायद्यांचे पूर्णपणे पालन करत आहे की नाही यावर भाष्य करणे कठीण असल्याचे लेखापरीक्षकांनी सांगितले. अदानी समूहाला पहिल्यांदाच क्वालिफाइड ओपिनियन मिळाले आहे. 


अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी रोजी आपला संशोधन अहवाल जाहीर केला होता. या अहवालात हिंडेनबर्गने  अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले. शेल कंपन्यांच्या (बनावट कंपन्यांच्या) माध्यमातून अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये पैसा गुंतवण्यात आला आहे, असा हिंडेनबर्गच्या अहवालात आरोप करण्यात आला होता. त्याशिवाय, शेअर्सच्या किंमती या कृत्रिमपणे फुगवण्यात आल्या असल्याचा आरोप करण्यात आला. कंपनीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचा दावा हिंडेनबर्गने केला होता. 


हिंडेनबर्ग संशोधन अहवालातील आरोपानंतर अदानी समूहाचे मोठे नुकसान झाले. बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे शेअर दर घसरले. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली बाजार नियामक सेबी हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेल्या आरोपांची चौकशी करत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: