India GDP:  प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असतानादेखील भारतीय अर्थव्यवस्थेने मार्च महिन्याच्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. भारताचा आर्थिक विकास दरात वाढ (GDP) झाली आहे. मात्र, औद्योगित उत्पादनात घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मधील जानेवारी ते मार्च या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.1 टक्के इतका राहिला. डिसेंबर महिन्याच्या तिमाहीत जीडीपीचा दर 4.4 टक्के इतका होता. तर, सप्टेंबरच्या तिमाहीत हा दर 6.3 टक्के इतका होता. वर्ष 2022-23 मध्ये भारताचा जीडीपी दर 7.2 टक्के इतका नोंदवण्यात आला. 


केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने (NSO) आज 2023 च्या व्यावसायिक वर्ष आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत भारताचा GDP वाढ 6.1 टक्के आहे. तर, हा दर 5.1 टक्के असण्याचा अंदाज होता. यासह, संपूर्ण आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर 7.2 टक्के राहिला आहे. तर, तो 7 टक्के असण्याचा अंदाज होता.


आर्थिक तज्ज्ञांनी, जीडीपी वाढीचा दर 4.9 ते 5.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षाही अधिक चांगली कामगिरी बजावली आहे. 


कृषी क्षेत्रात चांगली वाढ आणि देशातंर्गत वाढती मागणी यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पाश्चिमात्य देशांमध्ये मंदीचे वारे वाहत असताना दुसरीकडे भारताच्या जीडीपीमध्ये झालेली वाढ महत्त्वाची ठरणार आहे. भारतात तूर्तास मंदीचे सावट राहणार नसल्याचा अंदाज जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने वर्तवली होती. 


कृषी क्षेत्रात वाढ


कृषी क्षेत्रात तिमाही आणि वार्षिक आधारावर वाढ दिसून आली. मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीमध्ये कृषी क्षेत्राचा तिमाहीच्या तुलनेते 4.7 टक्क्यांहून वाढून 5.5 टक्के इतका झाला आहे. तर, मागील वर्षीच्या तिमाहीत हा आकडा 4.1 टक्के इतका होता. 


रिझर्व्ह बँकेने मार्चच्या तिमाहीत जीडीपीचा दर 5.1 टक्के इतका राहण्याचा अंदाज वर्तवला होता. तर, संपूर्ण आर्थिक वर्षासाठी हा दर 7 टक्के इतका नोंदवण्यात आला. आर्थिक वर्ष 2021-22 मधील मार्च महिन्याच्या तिमाहीत जीडीपीचा दर 4.1 टक्के इतका होता. त्यावेळी 4 टक्के राहणार असल्याचा अंदाद वर्तवण्यात आला होता. 


डिसेंबर 2022 मधील तिमाहीत जीडीपी 4.4 टक्क्यांनी वाढला होता. त्यावेळी जीडीपीचा दर 4.6 टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: