Government Schemes : साधारण गेल्या एका वर्षापासून वाढत्या महागाईमुळे रिझर्व बँकेककडून अनेक वेळा आपल्या व्याजदरात वाढ केली. तरीही अनेक बँका ग्राहकांना त्यांच्या  आरडीच्या योजनेवर (Recurring Deposit Scheme) जबरदस्त व्याज देत आहेत. परंतु यांनतरही बऱ्याच सरकारी योजनांमध्ये  (Government Schemes) बँकेतील आरडीच्या योजनेच्या तुलनेत सगळ्यात जास्त व्याज मिळत देत आहे. या सर्व पोस्ट ऑफिसच्या बचत योजना आहेत. या योजनांमध्ये ठराविक काळासाठी गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त परतावा मिळू शकतो. यासोबत गुंतवणूकदारांना टॅक्समधून सूट आणि सरकारी सुरक्षाही मिळते. अशा काही सरकारी योजना आहेत ज्यामध्ये नागरिकांनी गुंतवणूक केली, तर सर्वांत जास्त परतावा मिळू शकतो. या योजनांची माहिती सविस्तर माहिती घेऊया...


या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे सगळ्यात जास्त व्याज मिळू शकते : 


1. सुकन्या समृद्धी योजना :  


केंद्र सरकारने मुलींचे शिक्षण आणि विवाहाची चिंता दूर करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला प्रतिवर्षी  8 टक्के व्याज मिळते. या योजनेनुसार 10 वर्षापर्यंत मुलींचे खाते सुरू करता येते. या याजनेमध्ये प्रति वर्षी 250 रूपयापासून ते 1 लाख 50 हजार रूपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तसेच या योजनेत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर आयकर विभागाच्या कलम 80 सी नुसार टॅक्समधून सूटही मिळते


2.  जेष्ठ नागरिक बचत योजना :


सरकारने  जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली जेष्ठ नागरिक बचत योजना सगळ्यात चांगली योजना आहे. या योजनेनुसार ज्यांच वय 60 वर्ष पूर्ण केलेल्या कोणत्याही नागरिकांना आपल्या नजिकच्या पोस्ट ऑफिसमध्ये  खाते सुरू करता येऊ शकते. या बचत योजनेत गंतवणूक केल्यामुळे जमा केलेल्या रक्कमेवर 8.2 टक्के इतका जबरदस्त व्याज मिळतो. हा कोणत्याही बँकेतील आरडीच्या योजनेपेक्षा जास्त व्याजदर आहे. त्यामुळे ही जेष्ठ नागरिकांसाठी सगळ्यात चांगली योजना आहे.


3. राष्ट्रीय बचत योजना : 


केंद्र सरकारची आणखीन महत्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय बचत योजना होय. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 7.7 टक्के व्याज मिळते. या योजनेमध्ये कमीत कमी 100 रूपये आणि जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रूपये इतकी रक्कम गुंतवता येते. या गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर आयकर विभागाच्या कलम 80 सी नुसार 1.5 लाख रूपयांची सूट मिळते . 


4. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना :


पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेमध्ये बँकेतील RD Scheme सारखी सुविधा दिली जाते. या योजनेमध्ये तुम्ही 1 ते  5 वर्षासाठी  पैसे गुंतवू शकता. या 5 वर्षाच्या काळात जमा केलेल्या रक्कमेवर तुम्हाला 7.5 टक्के व्याज मिळते. त्यामुळे ज्यांना कमी काळासाठी गुंतवणूक करायची इच्छा आहे त्यांनी पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेचा विचार करायला हरकत नाही.  


या काही प्रमुख बँकांमध्ये RD Scheme वर  मिळणारे व्याज  :


1. अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक आरडी योजना : 7 टक्के व्याज, गुंतवणूक कालावधी 5 वर्ष     


2. डीसीबी बँक आणि आरडी योजना : 7.60 टक्के व्याज, गुंतवणूक कालावधी 5 वर्ष   


3. इंडसइंड बँक आणि आरडी योजना : 7.25 टक्के व्याज, गुंतवणूक कालावधी 5 वर्ष 


4. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि आरडी योजना : 7.20 टक्के व्याज, गुंतवणूक कालावधी 5 वर्ष 


5. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि आरडी योजना : 7.5 टक्के व्याज, गुंतवणूक कालावधी 5 वर्ष 


इतर बातम्या वाचा :


Government Scheme : अवघ्या 5 वर्षात व्हाल मालामाल, 'या' सरकारी योजनेत करा गुंतवणूक