Business News : एशियन पेंट्स (Asian Paints) या कंपनीच्या (comapny) संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. या कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ (Huge increase in profits) झालीय. कंपनीचा निव्वळ नफा हा 1275 कोटींवर पोहोचला आहे. नफा वाढल्यामुळं या कंपीनीने गुंतवणूकदारांना मोठा लाभांश घोषीत केला आहे. एशियन पेंट्सने मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2024 साठी गुंतवणुकदारांना प्रति शेअर 33.30 रुपये एकूण लाभांश घोषित करण्यात आला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नफ्यात मोठी वाढ
एशियन पेंट्सच्या ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल आर्थिक वर्ष 2024 मध्ये सुमारे 3 टक्क्यांनी वाढला आहे. हा महसूल 35,494.73 कोटी रुपये झालाय. एका वर्षापूर्वी हा आकडा 34,488.59 कोटी रुपये होता. यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एशियन पेंट्स या कंपनीचा निव्वळ नफा हा 1275 कोटींवर गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीला यावर्षी चांगला नफा झाला आहे. नफ्यात मोठी वाढ झालीय. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 1258.41 कोटी रुपयांचा नफा झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा नफा हा 1.3 टक्क्यांनी अधिक आहे. चौथ्या तिमाहीत व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई (EBIDTA) 9.3 टक्क्यांनी कमी होऊन 1,692 कोटी रुपये होती.
गुंतवणूकदारांना कधी मिळणार लाभांश?
एशियन पेंट्सच्या संचालक मंडळाने ऑक्टोबर 2023 मध्ये घोषित केलेल्या 5.15 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश व्यतिरिक्त 28.15 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. याचा अर्थ आर्थिक वर्ष 2024 साठी प्रति शेअर 33.30 रुपये एकूण लाभांश घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, मंजूर झालेला लाभांश 27 जून रोजी किंवा त्यानंतर दिला जाईल. कंपनीने 11 जून ही लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. त्यामुळं गुंतवणूकदरांना जून महिन्यात लाभांश मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 32.4 टक्क्यांनी वाढून 5,557.69 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो मागील वर्षीच्या 4,195.33 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीची एकत्रित निव्वळ विक्री वार्षिक 3 टक्क्यांनी वाढून 35,382 कोटी झाली. एका वर्षापूर्वी ती 34367.8 कोटी रुपये होती.
ॲबॉट इंडिया या कंपनीनेही गुंतवणुकदारांना जाहीर केला लाभांश
मागील दोन दिवसापूर्वीच फार्मा क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या ॲबॉट इंडियाने (Abbott India) चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीला देखील मोठा नफा मिळाला आहे. त्यामुळं या कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 410 रुपये लाभांश घोषित केला आहे. यामुळं गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या: