Amul: अमूलने (Amul) संपूर्ण जगात आपला दबदबा निर्माण केला आहे. जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड (Food Brand) म्हणून अमूल बनला आहे. अमूल ही खाद्य उत्पादने बनवणारी महाकाय कंपनी आहे. तिचे संपूर्ण भारतभर वर्चस्व आहे. आता जगातही अमूलनं मान्यता मिळवलीय.  एका अहवालानुसार, अमूल आता जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड बनला आहे. ब्रँड फायनान्सच्या अहवालात याला AAA+ रेटिंग देण्यात आलं आहे. कंपनीची ब्रँड व्हॅल्यू देखील 3.3 अब्ज डॉलर झाली आहे. कंपनीने मागील वर्षी या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या हर्षेला मागे टाकलंय. 


ब्रँड फायनान्स अहवालात अमूलने गाठला पहिला क्रमांक  


अमूलचा इतिहास जवळपास 70 वर्षांचा आहे. ब्रँड फायनान्सच्या ग्लोबल फूड अँड ड्रिंक्स रिपोर्ट 2024 नुसार, अमूल आता जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड बनला आहे. ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्सवर त्याचा स्कोअर 100 पैकी 91 आहे. याशिवाय, कंपनीला AAA+ रेटिंग देखील मिळाले आहे. 2023 च्या तुलनेत या वर्षी अमूलचे ब्रँड मूल्य 11 टक्क्यांनी वाढून 3.3 अब्ज डॉलर झाले आहे. ब्रँड मूल्याचा कंपनीच्या उलाढालीशी काहीही संबंध नाही. 2022-23 या आर्थिक वर्षात अमूलची विक्री 18.5 टक्क्यांनी वाढून 72,000 कोटी रुपये झाली आहे.


दुग्ध व्यवसायात अमूलच मोठं नाव


ब्रँड फायनान्स अहवालात, Amul ला Hersheys सोबत AAA+ रेटिंग देण्यात आले आहे. पण हर्षीचे ब्रँड व्हॅल्यू 0.5 टक्क्यांनी घसरून 3.9 अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळं त्याला यंदाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दुग्ध व्यवसायात अमूलच भारताच्या बाजारपेठेत मोठं नाव आहे. दूध बाजारात अमूलचा वाटा हा 75 टक्के आहे. लोणी बाजारात 85 टक्के आणि चीज मार्केटमध्ये 66 टक्के आहे. दरम्यान, ब्रँड फायनान्सच्या अहवालात अमूलला AAA+ रेटिंग देण्यात आलं आहे.  तर कंपनीची ब्रँड व्हॅल्यू देखील 3.3 अब्ज डॉलर झाली आहे. कंपनीने जगभरात आपला मोठा ठसा उमटवला आहे.


नेस्ले जगातील सर्वात मौल्यवान फूड ब्रँड 


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, नेस्ले हा जगातील सर्वात मौल्यवान फूड ब्रँड म्हणून पुढे आला आहे. त्याचे बाजारमूल्य गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी घसरले आहे. अंदाजे 20.8 अब्ज डॉलर आहे. तर 12 अब्ज मुल्यांकनासह Lay's या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. नॉन-अल्कोहोलिक बेव्हरेज क्षेत्रात कोका-कोला पहिल्या क्रमांकावर तर पेप्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


महत्वाच्या बातम्या:


महागाईचा परिणाम दुधावरही! अमूल, मदरनंतर आता परागनेही वाढवले दुधाचे दर, आजपासून नवे दर लागू