Success Story: अलीकडच्या काळात अनेक तरुण तरुणी नोकरी न करता व्यवसाय करणे पसंत करतात. तर काहीजण लागलेली चांगली नोकरी सोडून वेगळा उद्योग, व्यवसाय करतात. आज आपण अशातच एका महिलेबद्दल माहिती पाहणार आहोत. ज्या महिलेनं नोकरी सोडून स्कूल बसमध्ये राहणं सुरु केलं आहे. तरीदेखील ही महिला जेवढा पगाराचा पैसा मिळत होता, त्याच्या दुप्पट पैसा कमावत आहे. ॲलिस एव्हरडीन (Alice Everdeen) असं या 32 वर्षीय अमेरिकेच्या महिलेचं नाव आहे. पाहुयात या महिलेची यशोगाथा.


फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून 1 कोटींहून अधिक कमाई 


ॲलिस एव्हरडीन यांनी  2020 मध्ये ऑस्टिनमध्ये एका सप्लिमेंट कंपनीत काम केले होते. पण त्या  कामाला कंटाळल्या होत्या. या कंपनीत त्यांना 50 ते 60 तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागत होते. त्यामुळं त्यांनी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यानंतर आता पुढं काय? असा विचार त्यांच्या मनात आला. यावेळी त्यांनी एक स्कूल व्हॅन विकत घेतली आणि त्या व्हॅनमध्येच राहू लागल्या. या व्हॅनमधून त्या संपूर्ण देशात फिरत आहेत. प्रवास ॲलिस एव्हरडीन यांच्यासोबत त्यांचे पती आणि कुत्रा असतो. या प्रवासात ती कंटेन मॅनेजर म्हणून काम करते. वेगवेगळे व्हिडीओ देखील करते. फ्रीलान्सिंगच्या माध्यमातूनॲलिस एव्हरडीन 1 कोटींहून अधिक कमाई करते.


Fiverr सारख्या नामांकित कंपन्यांसाठी फ्रीलांसिंगचे काम


ॲलिस एव्हरडीन यांना पूर्वी नोकरी करुन जेवढे पैसे मिळत होते, त्याच्या दुप्पट पैसे आता मिळत आहेत. ॲलिस एव्हरडीन या फक्त व्हाईस ओव्हरच काम करत नाहीतर तर कंटेट तयार करणं, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ तयार करण्याचं काम करतात. यातून त्यांना मोठा पैसा मिळतो. याचबरोबर विविध ठिकाणची माहिती देखील त्यांना मिळते. ॲलिस Fiverr सारख्या नामांकित कंपन्यांसाठी फ्रीलांसिंगचे काम देखील करत आहेत.


घराच्या तुलनेत बसमध्ये राहणं खूप स्वस्त 


ॲलिस एव्हरडीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या बसमध्ये राहणं खूप स्वस्त आहे. त्यामानाने घरात राहण्याचा मोठा खर्च होतो. बसमध्ये फक्त खाण्याचा आणि पार्किंगचा खर्च होतो. कॅम्प ग्राउंडमध्ये बस पार्किंगसाठी 3 ते 6 हजार रुपयांचा खर्च येतो. तर सार्वजनिक ठिकाणी बस पार्किंग करण्यासाठी काहीही खर्च येत नाही. पेट्रोलसाठी महिन्याला एकूण 80 हजार रुपये तर जेवणासाठी महिन्याला 20 ते 40 हजार रुपये खर्च होत असल्याची माहिती ॲलिस एव्हरडीन यांनी दिली. ॲलिस तिच्या इंस्टाग्राम पेज @lifestooshortbus वर या प्रवासाशी संबंधित फोटो आणि मनोरंजक व्हिडिओ शेअर करते. 


महत्वाच्या बातम्या:


युवराज सिंहची अनोखी शेती, 26 जातींच्या आंब्याची लागवड, ऑनलाइन विक्रीतून कमावले लाखो रुपये