Jalna Lok Sabha Constituency : भाजपकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी (Lok Sabha Election BJP Candidate First List) जाहीर करण्यात आली आहे. ज्यात काही भाजपच्या (BJP) मोठ्या नेत्यांच्या नावांचा समावेश असून, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे देखील नाव आहे. दानवे यांचा राजकीय इतिहास (Political History) पाहता ग्रामपंचायत सदस्य ते दोन वेळा आमदार (MLA) आणि पाच वेळा खासदार (MP) असा त्यांचा प्रवास आहे. विशेष म्हणजे दानवे यांना पुन्हा एकदा जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दानवे यांच्याविरोधात आजही विरोधकांकडे सक्षम उमेदवार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे दानवे सहाव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
दानवेंची प्राथमिक माहिती...
- वडिलांचे नाव : स्व. दादाराव दशरथ पा. दानवे
- जन्म तारीख : 18 मार्च 1956
- जन्मस्थळ शिक्षण : जवखेडा खुर्द ता. भोकरदन जि. जालना (महाराष्ट्र)
- शिक्षण : पदवीधर (बी. ए.)
- व्यवसाय : शेती
- अपत्य माहिती : एक मुलगा तीन मुली.
- मतदार संघ : जालना (महाराष्ट्र)
- पक्ष : भारतीय जनता पार्टी
आजपर्यंत भूषवलेली राजकीय पदे...
- तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, भोकरदन, जि. जालना
- जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, जालना, जि. जालना
- प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य
- प्रदेश सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य
- प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य (दोन वेळा)
- प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी किसान आघाडी महाराष्ट्र राज्य
- सदस्य, केंद्रीय कार्य समिती भारतीय जनता पार्टी
- प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य सलग (दोन वेळा)
आजपर्यंत भूषवलेली संसदीय पदे....
- विधानसभा सदस्य, भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघ (सलग दोन वेळा)
- लोकसभा सदस्य, जालना लोकसभा मतदारसंघ (सलग तीन वेळा)
- चेअरमन, पंचायत राज समिती, महाराष्ट्र राज्य.
- सदस्य, वाणिज्य संबंधी संसदीय स्थायी समिती, भारत सरकार
- सदस्य, संसदीय सल्लागार समिती ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार
- सदस्य, वित्त संबंधी संसदीय स्थायी समिती, भारत सरकार
- सदस्य, संसदीय सल्लागार समिती माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार
- सदस्य, कृषी संबंधी संसदीय स्थायी समिती, भारत सरकार
- सदस्य, पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस संबंधी संसदीय स्थायी समिती, भारत सरकार
- सदस्य, केमिकल्स अँड फर्टिलायझर्स संबंधी संसदीय स्थायी समिती, भारत सरकार
- अन्न व नागरी पुरवठा व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री, भारत सरकार (दोन वेळा)
- रेल्वे कोळसा व खाण राज्यमंत्री, भारत सरकार
सहकार शिक्षण व अन्य क्षेत्रात भूषवलेली पदे...
- ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत जवखेडा खुर्द. ता. भोकरदन जि. जालना.
- सभापती, पंचायत समिती, भोकरदन जि. जालना.
- संचालक, भोकरदन तालुका शेतकरी सह. खरेदी-विक्री संघ म. भोकरदन जि. जालना.
- संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, भोकरदन जि. जालना (गेली 15 वर्षे)
- संचालक, मोरेश्वर शेतकरी सह खरेदी-विक्री संघ म., भोकरदन जि. जालना.
- संचालक, जिल्हा सहकारी दूध संघ म., जालना.
- संचालक, वैकुंठ मेहता साखर संघ, मुंबई.
- संचालक, शिवाजी शिक्षण संस्था.
- संचालक, विवेकानंद शिक्षण संस्था.
- संचालक, विविध कार्य सेवा सह संस्था म., जवखेडा खुर्द. ता. भोकरदन
- संचालक, श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाना म., सिपोरा बाजार
- चेअरमन, जालना जिल्हा मध्य सह. बँक म., जालना जि. जालना
- चेअरमन, श्री रामेश्वर सह साखर कारखाना म., सिपोरा बाजार, ता. भोकरदन जि. जालना (स्थापनेपासून सलग 15 वर्ष)
- चेअरमन, विठ्ठलआण्णा ग्राहक सहकारी संस्था म., भोकरदन जि. जालना.
- चेअरमन, स्वामी विवेकानंद नागरी सह. पतसंस्था, भोकरदन जि. जालना.
- चेअरमन, तालुका सह जिनिंग अंड प्रेसिंग म., भोकरदन जि. जालना.
- अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, भोकरदन जि. जालना.
- अध्यक्ष, स्वा सावरकर शिक्षण संस्था, भोकरदन जि. जालना.
- अध्यक्ष, जालना जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन, जालना.
- सचिव, मोरेश्वर शिक्षण संस्था म., भोकरदन जि जालना.
- सचिव व विश्वस्थ, श्री गणपती संस्थान, राजूर ता. भोकरदन जि. जालना.
- उपाध्यक्ष, ज्ञानसागर शिक्षण प्रसारक मंडळ, सिपोरा अंभोरा ता. जाफराबाद जि. जालना.
इतर महत्वाच्या बातम्या :