Air India Building: मुंबईतील नरीमन पॉइंट (Nariman Point) इथं एअर इंडियाची (Air India) एक ऐतिहासीक इमारत आहे. आता ही इमारत महाराष्ट्र सरकारची होणार आहे. गेल्या 50 वर्षापूर्वी या ऐतिहासीत इमारतीचं काम पूर्ण झालं होतं. अखेर ही इमारत महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. या इमारतीच्या बदल्यात महाराष्ट्र सरकारला एअर इंडियाला 1,601 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
अनेक दशकं झालं एअर इंडियाची ही इमारत नरीमन पॉइंट इथं आहे. मात्र, ही वास्तू आता महाराष्ट्र सरकारच्या मालकिची होणार आहे. केंद्र सरकारनं ही वास्तूमहाराष्ट्राला वितरीत करण्यास मान्यता दिलीय. एअर इंडिया कंपनी आता टाटा समुहाचा भाग झाली आहे. याबाबतचा दोन वर्षापूर्वीच करारही झाला आहे. पण मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची इमारत या कराराचा भाग नव्हती. त्यामुळं एअर इंडियाची ही इमारत महाराष्ट्र शासनानं घेतली आहे. ही इमारत समुद्र किनारी असल्यानं या वास्तूला एक वेगळं महत्व प्रात्त झालं आहे.
एअर इंडियाच्या इमारतीला 50 वर्ष पूर्ण
मुंबईतील नरीमन पॉइंट इथं समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एअर इंडियाच्या इमारतीला मोठं महत्व आहे. ही इमारत 23 मजली आहे. 1974 मध्ये या इमारतीचे बांधकाम झाले होते. म्हणजे बरोबर या इमारतीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र सरकारनं मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही इमारत संपदान करण्यास मान्यता दिली होती. यासाठी आता महाराष्ट्र सरकरा 1601 कोटी रुपये एअर इंडियाला देणार आहे.
दोन वर्षापूर्वीच टाटा समुहानं घेतली एअर इंडिया कंपनी
दोन वर्षापूर्वीच म्हणजे जानेवारी 2022 मध्ये टाटा समुहानं एअर इंडिया कंपनी ताब्यात घेतली होती. सरकार कंपनी असूनही एअर इंडियाची अवस्था बिकट झाल्यामुळं टाटा समुहानं या कंपनीची खरेदी केली होती. दरम्यान, एअर इंडिया ही फक्त एक विमान सेवा देणारी कंपनी नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या मनात असणारी कंपनी आहे. देशाचा गौरव म्हणून या विमानसेवा देणाऱ्या कंपनीकडे पाहिले जाते.
महत्वाच्या बातम्या: